आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार लाखांची लाच घेताना नगररचना अधिकारी जेरबंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- अहमदनगर महापालिकेचे नगररचना अधिकारी विश्वनाथ ढगे यांना गुरुवारी रात्री साडेदहाच्या वाजता चार लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली.

ढगे यांनी शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सचिन कटारीया यांच्याकडून बांधकाम परवानगीसाठी (लेआऊट मंजुरीसाठी) 18 लाख रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी कटारीया यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार ठरलेल्या दिवशी ढगे यांना पाइपलाइन रोडवरील त्यांच्या राहत्या घरी लाच घेताना एसीबीच्या पथकाने अटक केली.