आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘माध्यमिक शिक्षक’च्या वादळी सभेला भ्रष्टाचाराची किनार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वार्षिक सभेत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सभासद आक्रमक झाले. त्यांना सावरण्यासाठी सत्ताधांबरोबरच विरोधी संचालकांनीही शांततेचे आवाहन केले. छाया: कल्पक हतवळणे)
नगर - अकोले येथील माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या शाखेत एका शिक्षकाच्या नावावर परस्पर चार लाखांचे कर्ज घेण्यात आले. हे प्रकरण घडत असताना संचालक काय करत होते, असा सवाल सभासद दत्ता जाधव यांनी केला. गैरव्यवहार करणांची नावे जाहीर करायचे किंवा नाही या मुद्द्यावरून सभागृहात दोन गट पडले. अर्वाच्च भाषा वापरत एकमेकांवर धावून येण्याचाही प्रकार सभागृहात घडला. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सभा गाजली.

अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स को-ऑप क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत डावखर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष कल्पना जिवडे, संचालक भाऊसाहेब कचरे, अप्पासाहेब शिंदे, उत्तम खुळे, सुनील काकडे, धनंजय म्हस्के, चांगदेव खमनर, बाबासाहेब बोडखे, शैला जगताप, सचिव साहेबराव वांढेकर आदी उपस्थित होते.

सभा सुरू झाल्यानंतर काही वेळातच विरोधी संचालकांनी गांधी टोपी घालून सभागृहात प्रवेश केला. सभासद श्याम पटारे यांनी सभासदांना मद्यपि म्हणणांवर फौजदारी गुन्हे दाखल करता येतात का, असा सवाल केला. त्यानंतर सभासद जाधव यांनी माइकचा ताबा घेतला. ते म्हणाले, अकोले येथील संस्थेच्या शाखेत एका शिक्षकाच्या नावे एका कर्मचाने चार लाखांचे कर्ज परस्पर काढले. संबंधित शिक्षकाला याबाबत काहीच माहिती नाही. हे प्रकरण दडपण्याचा प्रकार झाला. संचालक त्यावेळी काय करत होते, त्याचवेळी कारवाई का केली नाही. संबंधित कर्मचारी संस्थेच्या सभासदाचा पाल्य नाही.असे सभासदानी सांगितले.

नंतर अर्धा तास गोंधळ सुरू होता. सभासदांना शांत करत कचरे म्हणाले, जाधव यांनी मांडलेला मुद्दा गंभीर आहे. संस्थेत जर गैर काही होत असेल, तर आम्हाला कळवा. आम्ही ते थांबवू. त्याचवेळी एका सभासदाने संबंधित कर्मचाचे, तसेच सभासदाचे नाव जाहीर करण्याचा आग्रह धरला. जाधव यांनी हे आव्हान स्वीकारून माइकचा ताबा घेतला. मी नाव सांगायला तयार आहे, असे ते म्हणताच सभागृहातील एका गटाने नाव सांगू नका, असे म्हणत व्यासपीठाच्या दिशेने धाव घेतली. संचालक कचरे यांनीही वादाचा मुद्दा होईल, म्हणून नाव सांगू नका असे सांगितले. त्यावर दुस गटाने नाव सांगण्याचा आग्रह धरून आरोप खोटे असतील, तर जाधवांनी माफी मागावी अशी भूमिका घेतली. जाधव यांनी नाव जाहीर करण्यास सुरुवात केल्यानंतर विरोधी संचालक शिंदे यांनी हस्तक्षेप करत चौकशी समिती नेमण्याची सूचना मांडली. त्याला कचरे यांनी सहमती दर्शवली. त्यानंतरही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून सभागृहात पळापळ सुरूच होती. नंतर सभेतील सर्व विषय आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.

७.७७कोटींचा नफा
संस्थेला२०१४-२०१५ यावर्षात कोटी ७७ लाख ६८ हजाराचा नफा झाला, तर ठेवींमध्ये १६ कोटी ७० लाखांत वाढ झाली आहे. सभासदांना १२ टक्के लाभांश देण्यात आला आहे.

पत्रकाराच्यानावाचा वापर
सभागृहात कारभारावर ताशेरे ओढत असताना काहींनी पत्रकार असल्याने मला या प्रकरणाची माहिती मिळाली आहे, अशी बतावणी केली. त्यामुळे इतर काही सभासदांनीही पत्रकार असल्याचा दाखला दिला. याचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने निषेध करून पत्रकार नि:पक्ष असतो. त्यामुळे या नावाचा वापर संस्थेच्या व्यासपीठावर करू नये, असे स्पष्ट केले.

संस्थेचे सचिव बदला
संस्था सुमारे ४५२ कोटींचा व्यवहार करते. हा व्यवहार महापालिकेएवढा आहे, पण संस्थेचा कारभार पाहण्यासाठी एकच अधिकारी आहे. चुकीच्या बाबींवर सचिव कधी आक्षेप घेत नाहीत. निमंत्रित सदस्य घेण्याचे निर्देश नसतानाही ते घेण्यात आले. नंतर उपनिबंधकांच्या आदेशानुसार ते काढावे लागले. हे सचिवांनी सांगणे अपेक्षित होते. त्यामुळे सचिवांनाच स्वेच्छानिवृत्ती द्या, अशी मागणी सभासद मारुती लांडे यांनी केली. सभेत संस्थेच्या विविध खर्चाच्या मुद्द्यावरून गोंधळ सुरू असतानाच माइकचा ताबा घेण्यासाठी सभासदांनी व्यासपीठावर गर्दी केली होती.

भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती
चारलाखांचे कर्ज एका शिक्षकाच्या नावाने काढणावर कारवाई करण्याची मागणी झाल्यानंतर सहाजणांची चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. या समितीमध्ये आरोप करणारे जाधव यांच्यासह काही विरोधी संचालकांनाही नेमले जाणार आहे, चौकशी अहवाल लवकर सादर करावी, अशी मागणी सभासदांनी केली.

इन्व्हर्टर खरेदीत घोटाळा
संचालकांनी इन्व्हर्टरची किंमत २३ हजार ५०० रुपये दाखवली आहे. प्रत्यक्षात त्याच कंपनीचे तेवढ्याच क्षमतेचे इन्व्हर्टर १७ हजार ५०० रुपयांत मिळते, असे सभासद सुनील दानवे यांनी कोटेशन दाखवून सिद्ध केले. या खरेदीत सहा हजारांचा अपहार करण्यात आला, असे ते म्हणताच अध्यक्ष डावखर यांनी सारवासारव केली. पण संचालक शिंदे यांनी दुकानदाराने या रकमेची कसर काढून देण्याचे सांगितले होते, हा मुद्दा निदर्शनास आणून कचरे यांना कोंडीत पकडले. पण कचरे यांनी याचा इन्कार करत पुढील खरेदीत त्याची कसर निघेल, असे स्पष्ट केले.


कचरेंनी जोडले हात
सभेतमद्यपि गोंधळ घालत असल्याचे पत्र सत्ताधांनी पोलिस प्रशासनाला दिले होते. या मुद्द्यावर सभासदांनी रान उठवून हा सभासदांचा अवमान असल्याची भावना व्यक्त केली. कचरे यांनी माफी मागावी, अशी मागणी झाली. यावर कचरे म्हणाले, माझा हेतू तसा नव्हता, पण कुणाचे मन दुखावले असेल तर कोपरापासून हात जोडून नतमस्तक होतो, असे म्हणत मद्यपीच्या मुद्द्यावर माफी मागीतली.
बातम्या आणखी आहेत...