आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात-बारा उताऱ्यांसाठी तलाठी कार्यालयांत लूट, 30 ते 40 रुपये अकारणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामखेड- प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत लागणारे सातबारा उतारे काढण्यासाठी जामखेड तालुक्यातील तलाठी कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांची तलाठ्याकडून लूट सुरू आहे. शेती उतारा काढण्यासाठी शासनाने १५ रुपये घेण्याचा आदेश असताना तलाठ्याकडून उताऱ्यासाठी ३० ते ४० रुपये, तर पीक विम्याच्या अर्जावर सही करण्यासाठी १० ते २० रुपयांचा दर आकारून शेतकऱ्यांची लूट होत असताना याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. 

तालुक्यातील सारोळा खुर्ददैठण येथील शेतकऱ्यांनी ७/१२ उतारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयात गर्दी केली होती. मात्र, दुपारी एक वाजेपर्यंत तलाठी आलेले नव्हते. यावर संतप्त शेतकरी प्रतिक्रिया देताना म्हणाले, आम्ही सकाळी वाजता तलाठी कार्यालयात आलो असता तलाठी मॅडम आल्या नाहीत. आम्ही फोन केला असता तुम्ही बसा, आम्ही नंतर येऊ असे उत्तर देऊन फोन ठेवून दिला. यामुळे तालुक्यातील तलाठी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तालुक्यासह ग्रामीण भागात महसूल प्रशासनाचा तलाठ्यांवर अंकुश नसल्याने माेठ्या प्रमाणावर तलाठी त्यांना नेमून दिलेल्या कार्यस्थळी उपलब्ध राहत नसल्याचे दिसून येत आहे. 

तलाठी भेटत नसल्याने शेतकरी आणि विद्यार्थ्यांची रखडण्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत तहसीलदारांकडे तक्रारी करून दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. महाविद्यालयीन प्रवेश तसेच विविध सवलतीचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तत्काळ मिळणे विद्यार्थ्यांकरिता गरजेचे असते. तर, शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी सात-बारा आणि खाते उतारा आवश्यक आहे. ही सर्व कागदपत्रे विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध व्हावीत म्हणून तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना महसूल विभागाकडून देण्यात आल्या आहेत. परंतु, ग्रामीण भागात काही अपवाद वगळता या सूचनांकडे तलाठ्यांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. नेमून दिलेल्या गावांना तलाठी उपस्थित राहत नसल्याने शेतकरी विद्यार्थी यांची गैरसोय होत आहे. 

संबंधित तलाठ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे पालकमंत्री राम शिंदे यांच्याच मतदारसंघात अशी लूट होत आहे. प्रत्येक गावातील तलाठी सज्जे येथे तलाठ्यांना काम करण्याचे आदेश असताना देखील रेंज प्रोब्लेमच्या नावाखाली सर्व तलाठी जामखेड येथे काम करतात. सज्जातील प्रत्येक तलाठ्याने आपल्या सोयीनुसार वार ठरवून दिले आहेत. मात्र, या दिवशीही हे तलाठी उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे नागरिकांना दिवसभर थांबूनही रिकाम्या हाताने परतावे लागते. पीक विम्यासाठी जामखेड येथे उताऱ्यासाठी ३० ते ४० रुपये घेत आहेत. 

तहसीलदारांचे दुर्लक्ष 
काही तलाठी गैरहजर असल्याने या गावातील शेतकरी पीक विमा योजनेचे चलन भरण्यापासून वंचित राहत आहेत. या संदर्भात तहसीलदार भंडारी यांनी खेड्यात इंटरनेट नसल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी कामे करत आहे. तलाठी दुपारी वाजेपर्यंत कामावर येत नसल्याचे शेकऱ्यानी सांगितले. यावर तहसीलदार भंडारी यांनी बोलणे टाळले. 

७/१२ उताऱ्यासाठी पंधरा रुपयेच फी 
आॅनलाइनसात-बाराउताऱ्यासाठी १५ रुपये साठी १५ रुपये फी ही रितसर घेतली जाते. या व्यतिरिक्त कामगार तलाठी जादा पैसे घेत नाहीत. कामगार तलाठ्यांनी कामाच्या ठिकाणी कार्यालयीन वेळेत थांबण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.
- विजयभंडारी, प्रभारी तहसीलदार, जामखेड. 
बातम्या आणखी आहेत...