आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपाशीचे बियाणे स्वस्त; शेतकरी खूश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सूनही वेळेत दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खरिपासाठी बियाणे खरेदीकरिता लगबग सुरू केली आहे. कापसाच्या बियाणांचे भाव सुमारे शंभर रुपयांनी घसरल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
लहरी हवामानामुळे मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांना समाधानकारक उत्पन्न मिळाले नाही. अवेळी आलेला पाऊस गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाऊन लाखो रुपयांच्या शेतमालाचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मान्सूनचे आगमन सरासरी पावसासंदर्भात समाधानकारक भाकिते व्यक्त होत असल्याने शेतकऱ्यांसह शेतीसंलग्न व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पेरणीपूर्व मशागत पूर्ण झाली असून शेतकरी आता पेरणीची तयारी करत आहेत. त्यासाठी बियाणांच्या दुकानात शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे.
दरवर्षी कपाशीच्या विशिष्ट वाणाला मागणी वाढल्याने काळ्याबाजाराचे प्रमाण वाढले होते. यंदा मुबलक बियाणे उपलब्ध झाल्याने काळ्याबाजाराला आळा बसला आहे. शासनाने बीटी कापसासंदर्भात सोमवारी अधिसूचना काढून २०१५-२०१६ या वर्षासाठी नवीन दर जाहीर केले आहेत. बीटी कॉटन बोलगार्ड - या वाणाचे पाकीट ८३० रुपयांवरून ७३०, बीटी कॉटन बोलगार्ड - या वाणाची किंमत ९३० वरून ८३० रुपयांपर्यंत कमी करण्यात आली. बियाणांचे दर कमी केल्याने उत्पादक सहविक्रेता कंपनी, वितरक, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते आणि कृषी विभागाचे विभागीय कृषी सह संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी यांना शासनाने परिपत्रक पाठवून दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कपाशी उत्पादकांमध्ये उत्साह वाढला कापूस उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.
जुन्या बियाणांची नोंद
बीटीकॉटनचे दर कमी केल्याने ज्या ठिकाणी जुन्या दराचे बियाणे शिल्लक आहे, अशा व्यावसायिकांनी जुन्या दराच्या बियाणांची लॉटनिहाय पॅकिंग विक्री केलेले कापूस बीटी बियाणांची स्वतंत्र नोंद ठेवावी, अशी सूचना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केली आहे.
बातम्या आणखी आहेत...