आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांनी केली आमदारांची "झोपमोड', आ. जगताप यांना दिले निवेदन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने १४ नोव्हेंबरला रात्री झोपमोड आंदोलन करण्यात आले. परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार संग्राम जगताप यांची झोपमोड करून निवेदन दिले.

विभागीय अध्यक्ष सुनील पंडित, राजेंद्र लांडे, आप्पासाहेब शिंदे, उध्दव गुंड, भानुदास दळवी, बाबासाहेब बोडखे, सतीश इंगळे, शशिकांत तांबे, सुनील सुसरे, अशोक डोळसे, अविनाश गवळी, संदीप पानमळकर, विष्णू मगर, ठाकूरदास परदेशी, महादेव भद्रे, विष्णू मगर, घनश्याम सानप आदी उपस्थित होते. शिक्षणविषयक सरकारी धोरणांबाबत शिक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. या क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने राज्यातील शिक्षण संस्था महामंडळ, माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महासंघ, संयुक्त महामंडळ, राज्य माध्यमिक शिक्षक संघ, राज्य शाळा शिक्षकेतर महामंडळ, कला शिक्षक संघ, क्रीडा शारीरिक शिक्षक महासंघ आदी संघटनांनी एकत्र येऊन राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून आंदोलन सुरु केले आहे.
आंदोलनाचे विविध टप्पे ठरवून परिषदेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन काळ्या फिती बांधून काळी दिवाळी साजरी करण्यात आली. त्यानंतर १४ नोव्हेंबरला रोजी रात्री झोपमोड आंदोलन करण्यात आले. ३० नोव्हेंबरला शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा, डिसेंबरला राज्यातील शाळा बंद ठेवून, १० डिसेंबरला नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. मागण्यांवर विचार झाल्यास शाळा बंदचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

संच मान्यतेचा २८ ऑगस्टचा शासन आदेश रद्द करावा, कला क्रीडा शिक्षकांची पूर्णवेळ नियुक्ती करावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.

प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याबाबत सरकारचा निषेध करणारे निवेदन आमदार संग्राम जगताप यांना देऊन झोपमोड आंदोलन करताना राज्य शिक्षक परिषदेचे पदाधिकारी.