आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने न्यायालयाचे कामकाज बंद, आयोजकांविरुध्‍द गुन्‍हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - न्यायालयाच्या दारातच कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाची जिल्हा सत्र न्यायालयाने दखल घेत संबधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. अठरा बॅण्डवाल्यांसह पाच आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 
 
सूर्या करिअर अॅकेडमी या पोलिस तत्सम भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेने मंगळवारी गणेश विसर्जन मिरवणूक काढली. आवश्यक त्या परवानगी संबंधितांनी घेतल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन करत त्यांनी एका वाहनावर पंधरा लहान-मोठे ध्वनिवर्धक बसवत वाहतुकीला अडथळे आणत दणदणाटात मिरवणूक काढली. मिरवणुकीचे मुख्य संयोजक अण्णासाहेब सुदाम काकड, वैभव विठ्ठल काकड, भारत भाऊसाहेब आगलावे, तुषार सुभाष कैचे आणि दिलीप दावल सोनवणे (बॅण्डमालक) यांच्याव गुन्हा दाखल करण्यात आला. 
बातम्या आणखी आहेत...