आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र बालक मंदिरमधील विद्यार्थ्यांची फटाकेमुक्तीची शपथ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - फटाक्यांचे दुष्परिणाम पाहून महाराष्ट्र बालक मंदिरच्या विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. ‘दिव्य मराठी’मध्ये सोमवारी फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत जागृती करणारे वृत्त प्रसिद्ध झाले. महाराष्ट्र बालक मंदिरच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना फटाक्यांचे दुष्परिणाम सांगून ही दिवाळी फटाकेमुक्त साजरी करण्याची शपथ देवविली.
सोमवारी शाळेत हा कार्यक्रम झाला. शिक्षकांनी ‘दिव्य मराठी’च्या वृत्ताचे वाचन केले. विद्यार्थ्यांना फटाक्यांचे दुष्परिणाम समजून सांगितले. त्यात प्रामुख्याने हवेचे ध्वनी प्रदूषण म्हणजे काय, याची मुलांना माहिती देण्यात आली. फटाके कसे धोकादायक रसायनांपासून बनवले जातात, याची त्यांनी माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मैदानात जमून यापुढे फटाके फोडण्याची शपथ घेतली.

मुख्याध्यापक सुरेश शेवाळे म्हणाले, गेल्या वर्षी ‘दिव्य मराठी’ने राबवलेल्या फटाकेमुक्त दिवाळी उपक्रमात आमच्या शाळेतील मुलांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांनीच त्यांच्या पाालकांकडे फटाके आणू नका, असा आग्रह धरला. गेल्या वर्षी फटाके फोडल्याने वाचलेली रक्कम विद्यार्थ्यांनी शाळेकडे जमी केली. ती स्नेहालय संस्थेला देण्यात आली.

तुम्हीही शपथ घ्या...
^फटाके घेण्यासाठीचे पैसे मी गरजू गरीब मुलांच्या देणार आहे. गेल्या वर्षी माझ्या बाबांनी अनाथ आश्रमाचे पत्रे व्यवस्थित करून दिले होते. फटाक्यांमुळे हवा ध्वनीचे प्रदूषण होते. त्यामुळे मी फटाके फोडण्याची शपथ घेतली होती. आता तुम्हीही घ्या.’’ अनुष्का दळवी, विद्यार्थिनी.

समाजाचा विचार करा
^‘दिव्यमराठी’ने राबवलेल्या फटाकेमुक्त दिवाळीच्या स्तुत्य उपक्रमाला मी धन्यवाद देऊ इच्छिते. हा उपक्रम या वर्षीही राबवून आम्ही वंचितांच्या चेहऱ्यांवर हसू फुलवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्यांच्या घरात प्रकाशाची गरज आहे, त्यांच्या घरात तो देण्याचा आमचा प्रयत्न राहील. सर्वांनीच फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची गरज आहे.’’ संगीता साळवी, उपशिक्षिका, महाराष्ट्र बालक मंदिर.

गरिबांना मदत करा
^अलीकडील काळात फटाक्यांच्या प्रदूषणाच्या भस्मासुरामुळे दिवाळीचा आनंद हिरावला जात आहे. आमच्या शाळेतील चिमुरडे मात्र ‘फटाकेमुक्त दिवाळी’चा संकल्प करून तो दृढपणे राबवत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. या वर्षीही आमच्या शाळेतील विद्यार्थी फटाक्यांचे पैसे वाचवू गरीब गरजूंना मदत करणार आहेत.’’ अर्चनागिरी, उपशिक्षिका, महाराष्ट्र बालक मंदिर.

फटाके फोडणार नाही
^मी कधीच फटाके फोडणार नाही, अशी शपथ घेतली. फटाक्यांचे उरलेल्या पैशांची मी गरजूंना मदत करणार आहे. मी सर्वांना आवाहन करतो, की तुम्हीही कधी फटाके फोडू नका. गोरगरीब मुलांना मदत करा. विशेषत: अनाथ मुलांना शिक्षणासाठी मदत करा. '' प्रणवनितीन वाळके, विद्यार्थी.
बातम्या आणखी आहेत...