आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CREDAI Association President Of Jawahar Mutha Appeal

सामान्यांना परवडणा-या किमतीत घरे उपलब्ध करा, 'क्रेडाई'चे अध्यक्ष जवाहर मुथा यांचे आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- समाजातील सत्तर टक्के लोकांना परवडणारी व तीस टक्के लोकांना आवडणारी घरे बांधकाम व्यावसायिकांनी उपलब्ध करावीत, असे मत क्रेडाई संघटनेचे अध्यक्ष जवाहर मुथा यांनी व्यक्त केले. दैनिक दिव्य मराठी व क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत सावेडीतील जॉगिंग ट्रॅक मैदानावर प्रॉपर्टी शोकेस हे गृह व वाहन प्रकल्पावर आधारित प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या लोगोचे अनावरण गुरुवारी "दिव्य मराठी'च्या कार्यालयात झाले.
याप्रसंगी मुथा बोलत होते. यावेळी ब्युरो चिफ मिलिंद बेंडाळे, उपव्यवस्थापक नीलेश सोनवणे, बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल मुरकुटे, आर्किटेक्ट, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर असोसिएशनचे अध्यक्ष इकबाल सय्यद,इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरियर डिझायनर अहमदनगर सेंटरचे अध्यक्ष अमोल खोले, इंटेरियर डिझायनर असोसिएशनचे अध्यक्ष अजय अपूर्वा, बीजीएस डेव्हलपर्सचे संचालक संजय गुगळे, आदर्श बिल्डर्सचे संचालक प्रकाश जैन, अभिनव डेव्हलपर्सचे संचालक रमेश पितळे आदी उपस्थित होते. मुथा म्हणाले, कमी किमतीची घरे खरेदी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत बांधकाम व्यावसायिकांनी घरे उपलब्ध करून द्यावीत. नगरमध्ये बांधकाम व्यावसायिकांना मोठी संधी आहे. त्यासाठी अशा पद्धतीने प्रदर्शनाचे आयोजन केल्याने एकाचवेळी एकाच ठिकाणी अनेक घरांच्या स्कीम्सची माहिती उपलब्ध होईल. खोले म्हणाले, नगरमध्ये वास्तूप्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळतो. अशा पद्धतीचे उपक्रम पुढील काळातही आयोजित करावेत. त्यासाठी इस्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरियर डिझायनर संस्थेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. या प्रदर्शनात इंटेरियर डिझाईनसाठी आवश्यक विविध साहित्य उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक बेंडाळे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अविनाश कराळे यांनी केले.

प्रदर्शनात काय असेल
बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, बँक फायनान्स, वास्तूशास्त्र, आर्किटेक्ट, इंटेरियर डिझायनिंग, कर्टन फिटिंग, डेकोरेटिव्ह लॅमिनेशन, इलेक्ट्रिकल वस्तू, होम डिझायनिंग, फायर सिस्टिम्स व वॉटर प्रूफिंग, वॉटर टँक, सोलर सिस्टिम, दुचाकी व चारचाकी वाहनेही या प्रदर्शनात उपलब्ध असतील. देशातील अनेक नामांकित कंपन्या व मान्यवर बांधकाम व्यावसायिकांच्या फर्म या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.