आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Crime Against Mother Who Throwing Five Months Child In Garbage

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाच महिन्यांचा चिमुकला कचर्‍यात टाकणा-या मातेविरुद्ध गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पाच महिन्यांच्या चिमुकल्याला कचर्‍यात टाकून देण्याचा प्रकार कल्याण रस्त्यावरील सीना नदी परिसरात मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आला. हे बालक टाकणार्‍या मातेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेण्यात आले आहे. कल्याण रस्त्यावरील अमरधाम ते सीना नदीदरम्यान महाराष्ट्र चिकन शॉपीच्या पाठीमागे कचर्‍यात पाच महिन्यांचे बालक आढळले.

माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक राहुलकुमार पाटील पथकासह घटनास्थळी रवाना झाले. याच परिसरातील एका टपरीमागे बसून भ्रूण प्रसूत करून टाकून दिल्याची माहिती एका महिलेने पोलिसांना दिली. त्यानुसार शोध घेत पोलिसांनी संगीता संतोष चव्हाण (30, शिवाजीनगर, कल्याण रस्ता) हिला ताब्यात घेऊन चौकशी केली. ‘पोटात कळा आल्याने थांबले व भ्रूण बाहेर आल्याने घाबरून ते तिथेच टाकून निघून गेले’, अशी कबुली या महिलेने दिली. सध्या तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला एक मुलगा व एक मुलगी असल्याची माहिती समोर आली आहे. सिव्हिलमध्ये जात असल्याचे सांगून ती घराबाहेर पडली होती.