आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंग प्रकरण: पीडित मुलीच्या आईने दिली आरोपीला साथ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- पंधरा वर्षांची मुलगी घरी एकटीच असल्याचा गैरफायदा घेऊन विनयभंग करण्याची घटना सावेडीतील सपकाळ चौक परिसरात 7 सप्टेंबरला घडली होती. पीडित मुलीच्या आईचीच आरोपीला साथ असल्याचे तपासात स्पष्ट झाले असून तिलाही आरोपी करण्यात आले आहे.

पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन रमेश मुरलीधर बर्डे (वय 30, तपोवन रस्ता, सावेडी) व मुलीच्या आईविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनयभंगाबाबत मुलीने आईला माहिती देऊन पोलिसात तक्रार करण्याची विनवणी केली. मात्र, पोलिसात गेल्यास जीवाचे बरेवाईट करुन घेण्याची धमकी आईने दिली. तरीही न डगमगता या मुलीने 8 सप्टेंबरला तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी बर्डे याला अटक करुन न्यायालयात हजर केले. सुरुवातीला त्याला पोलिस कोठडी देण्यात आली. आता तो न्यायालयीन कोठडीत आहे. पीडित मुलीच्या आईचे आरोपीशी अनैतिक संबंध असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. याच कारणाचा आधार घेऊन पोलिसांनी आरोपीच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली.