आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनायकनगरमध्ये धारदार शस्त्राने दाम्पत्याचा खून, नातेवाईकांवर शोककळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर-पुणेरोडनजीकच्या विनायकनगर परसिरातील समता कॉलनीमध्ये अज्ञात इसमांनी एका दाम्पत्याचा टणक हत्याराने वार करून खून केला. प्रकाश गुलाब रोडे (५०) मीनाक्षी प्रकाश रोडे (४५, मूळ सुरेगाव, ता. श्रीगोंदे) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. धुणीभांडी करायला आलेल्या मोलकरणीने पाहिल्यामुळे गुुरुवारी सकाळी अकरा वाजता हा प्रकार उजेडात आला. प्रथमदर्शनी चोरीचा बनाव विनायकनगर परसिरात यामुळे खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी रोडे यांच्या नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी, प्रकाश गुलाब रोडे (वय ५५) यांनी वायुदलातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेली होती. सध्या एमआयडीसीतील एल अँड टी कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून कामाला होते, तर मीनाक्षी प्रकाश रोडे या गृहिणी होत्या. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. मोठा मुलगा स्वप्नील अमेरिकेत मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीला आहे, तर मुलगी कोमल ही पुण्यात शिक्षण घेत आहे. रोडे दाम्पत्याची सुरेगावला शेती आहे. प्रकाश यांचा भाऊ ईश्वर मुंबईत कंपनीत नोकरीला आहे.
चोरी नव्हे खूनच
जुलै महिन्यात एल अँड टी कंपनीच्या गोदामातून ६३ हजार रुपयांच्या कॉपरच्या पट्ट्या चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. ही बाब लक्षात आल्यानंतर प्रकाश गुलाब रोडे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून पोलिसांनी मुकुंदनगरमधील दोघा कामगारांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवला होता. रोडे दाम्पत्याच्या खून प्रकरणाशी याचा काही संबंध आहे का, यादृष्टीनेही पोलिस तपास करीत आहेत.
रोडे दाम्पत्याचा खून करून घरातील सामानाची उचकापाचक करण्यात आलेली आहे. पण, घराच्या आवारात लावलेली दुचाकी किरकोळ रोकड वगळता घरातील मौल्यवान वस्तू चोरीला गेलेल्या नाहीत. त्यामुळे प्रथमदर्शनी चोरीचे कारण वाटत असले, तरी ती शक्यता कमीच आहे. शिवाय या परसिरात चोरट्यांचा उपद्रव फारसा नसल्याचे समतानगर परसिरातील नागरिकांनी सांगितले. तसे असते तर शेजारीही चोरीचा प्रयत्न झाला असता, तरीही पोलिस त्यादृष्टीनेही तपास करीत आहेत.
प्रकाश रोडे यांना चुलतभाऊ चुलत बहिणी आहेत. त्यांची सासूरवाडी नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथील आहे. आसाराम बापू खेंगट हे त्यांचे सासरे आहेत. श्रीगोंद्यातील वृक्षमित्र आबासाहेब मोरे प्रकाश रोडे यांचे मेहुणे आहेत. मंगल आबासाहेब मोरे (श्रीगोंदे), जनाबाई शिवराम मोरे (विसापूर), वंदना पादीर (नगर), कुसुम पठारे (वाळवणे, पारनेर) या त्यांच्या बहिणी आहेत. रोडे दाम्पत्य शांत स्वभावाचे होते, असे नातेवाईकांनी सांगितले.