आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, 886 Criminal Back Grounded People's Take Notice Issue At Ahmednagar

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 886 जणांना नोटिसा, जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा व पोलिस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 886 जणांना नोटिसा बजावल्या, तर 2 हजार 541 जणांना वॉरंट बजावले आहेत. 971 जणांना वॉरंट बजावण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी बुधवारी दिली.

लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कवडे बोलत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव, निवडणूक उपअधिकारी सुनील माळी आदी यावेळी उपस्थित होते.

कवडे म्हणाले, जिल्ह्यात संवेदनशील मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील. निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर अनधिकृत शस्त्रे बाळगणार्‍यांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे.आतापर्यंत पोलिसांनी 22 शस्त्रे जप्त करण्यात आले आहेत. त्यात 9 पिस्तूल, 9 तलवारी, 2 कोयते व 2 सुरे या शस्त्रांचा समावेश आहे. 29 काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत.

परवानाधारकांनी शस्त्र जमा करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. त्यानुसार 1200 परवानेधारक शस्त्र प्रशासनाने जमा केले असून, 2 हजार 67 परवाने जमा करण्याचे काम सुरू आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्‍यांच्या याद्या करण्याच्या सूचना सर्व पोलिस ठाण्याला देण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या कालावधीत पैशांचा गैरवापर मोठय़ा प्रमाणात होतो. त्या पार्श्वभूमीवर पथकांमार्फत चेक पोस्टवर वाहने तपासण्यात येणार आहेत, असे कवडे यांनी सांगितले. आचारसंहिता भंगाच्या आतापर्यंत 12 तक्रारी आल्या आहेत. त्यातील चार तक्रारींवर कारवाई करण्यात आल्याचे आचारसंहिता कक्षाचे प्रमुख व निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव यांनी सांगितले.