आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणेकर खूनप्रकरणी ५ दरोडेखोर अटकेत, मोक्का अंतर्गत कारवाई होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शिवसेनेचे मुखेड (जि. नांदेड) तालुकाप्रमुख शंकर माधव ठाणेकर यांच्या खूनप्रकरणी ५ दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली. लूटमार करताना प्रतिकार केल्यामुळे ठाणेकर यांचा गोळ्या घालून खून झाला होता. आरोपी नगर व पुणे जिल्ह्यातील असून त्यांच्याकडून दरोड्याचे अनेक गुन्हे उघडकीस येत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर "मोक्का'अंतर्गतही कारवाई करणार असल्याचे पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनी सांगितले.

ठाणेकर हे सहकाऱ्यांसह नांदेडला जात असताना ३ सप्टेंबरच्या मध्यरात्री दरोडेखोरांनी गोळ्या झाडून त्यांचा खून केला. या खुनाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे होता. तपासाकरिता तीन पथके स्थापन करण्यात आली होती. त्यांनी नगर, पुण्यासह इतर जिल्ह्यांतही तपास केला. मंगळवारी राहुरी परिसरात ५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
प्रशांत कोळी (२८, निगडी, पुणे), बबन ऊर्फ अतुल घावटे (२५, श्रीगोंदे), किरण ऊर्फ गोट्या हरिभाऊ सोनवणे (१९, पारनेर), संदीप ऊर्फ अण्णा अर्जुन धावडे (२१, श्रीगोंदे) व उमेश भानुदास नागरे (२५, लोणी, ता. राहाता) अशी आरोपींची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे, संजय पाटील, सहायक निरीक्षक राहुल गायकवाड, सुनील टोणपे, किरणकुमार परदेशी, हेडकॉन्स्टेबल राकेश खेडकर, दीपक हराळ, रमेश माळवदे, बाबा गरड, संदीप पवार, दत्ता हिंगडे, योसेफ साळवे, उमेश खेडकर, रावसाहेब हुसळे, सचिन मिरपगार, मधुकर शिंदे, प्रसाद भिंगारदिवे, भागीनाथ पंचमुख आदींच्या पथकाने ही कारवाई केली.