आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिमुरडीला जन्मदात्याकडून जीवे मारण्याचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दुसरीही मुलगीच झाली व ती सारखी रडारड करते म्हणून जन्मदात्या बापानेच एक महिन्याच्या चिमुरडीला घरातील सिमेंटच्या ओट्यावर आपटून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा संतापजनक प्रकार एमआयडीसीतील नागापुरात गेल्या शुक्रवारी (१२ सप्टेंबरला) घडला. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी संतोष गुंजाळ (नागापूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

संतोष गुंजाळ याला यापूर्वीही एक कन्यारत्न आहे. एक महिन्यापूर्वी त्याला अाणखी एक मुलगी झाली. ही मुलगी सारखी रडते म्हणून तो चिडचिड करायचा. रडणाऱ्या बाळाचा आवाज बंद कर, नाहीतर तिचा जीव घेईन, अशी धमकीही त्याने बायकोला दिली होती. शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्याची मुलगी रडत असल्यामुळे त्याने तिच्या पायाला धरून घरातील ओट्यावर आपटले. त्यामुळे ही मुलगी गंभीररित्या जखमी झाली. तिची प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे तिला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले आहे. तेथे तिच्या आईने दिलेल्या जबाबावरून बंडगार्डन पोलिसांनी संतोषविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा नंतर शून्य क्रमांकाने तोफखाना पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत पोलिसांनी संतोषला अटक केलेली नव्हती.