आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Mobile Theft Issue At Nagar, Divya Marathi

गुंगीचे औषध देऊन रेल्वे प्रवाशांना लुटणारा गजाआड, चोरीचे मोबाइल जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - रेल्वेमधील प्रवाशांना थंडपेयात गुंगीचे औषध टाकून लुटमार करणा-याला रेल्वे पोलिसांनी गजाआड केले. याप्रकरणी नांदेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी वेषांतर करून त्याला बुधवारी दुपारी गजाआड केले. न्यायालयाने त्याला 25 जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली.
अभयकुमार हिरालाल गौतम (लालगंज, उत्तर प्रदेश) त्यांच्या दोन मित्रांसह दौंडहून मनमाडला जात असताना प्रवासात थंड पेय प्याल्यानंतर त्यांना गुंगी आली. त्यामुळे ते मनमाडला जाण्याऐवजी नांदेडला गेले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांना लुटले गेल्याचे लक्षात आले. त्यांनी नांदेड पोलिसांत तक्रार दिली. नंतर हा गुन्हा नांदेड पोलिसांनी नगरला वर्ग केला. रेल्वे पोलिसांनी तपासाकरिता पथक नेमले. या पथकाने आरोपीचा नगर, दौंड, शिर्डी व मनमाड रेल्वेस्थानकावर शोध घेतला. नांदेड पोलिसांनी दिलेल्या वर्णनाशी मिळताजुळता आरोपी त्यांना नगर रेल्वेस्टेशनवर मिळाला. प्रकाश ऊर्फ बिट्टू भगवान कांबळे (42, केळवाडी, वाशी, उस्मानाबाद) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये त्याच्याकडे गुंगीच्या गोळ्या व 3 चोरीचे मोबाइल मिळाले.
रेल्वे पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सोनवणे यांच्या पथकातील सहायक फौजदार एस. डी. दिवटे, हेड कॉन्स्टेबल भारत सलगर, ए. जे. अस्वदे, ओहोळ, टिमकरे, खान यांच्या पथकाने ही कारवाई केली.