आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Set Fire, Shrirampur, Divya Marathi

किरकोळ रकमेच्या देवाण-घेवाणीवरून दिराने भावजयीला पेटवून दिले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर - किरकोळ रकमेच्या देवाण-घेवाणीवरून राग आल्याने दिराने रॉकेल टाकून भावजयीला पेटवले. तालुक्यातील नाऊर येथे शुक्रवारी (21 मार्च) घडलेल्या या घटनेत मंगल रमेश शिंदे 22 टक्के भाजली. याप्रकरणी दीर देविदास रंगनाथ शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे.


देविदास शिंदे व त्याची भावजयी मंगल एकत्र राहतात. शुक्रवारी त्यांच्यात 170 रुपयांवरून भांडण झाले. भांडण विकोपाला गेल्यानंतर मंगलने देविदासला वेगळे राहण्याची सूचना केली. त्याचा राग येऊन त्याने मंगलच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. तिला जखमी अवस्थेत गंगाधर ओगले रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र जगधने यांनी सांगितले. तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश क्षीरसागर यांनी मंगलचा जबाब नोंदवला. त्यानुसार देविदास शिंदे याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.