आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Women Suicide Issue At Nagar, Divya Marathi

विवाहितेची आत्महत्या;माय-लेकांना कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शेजारी राहणार्‍या कुटुंबीयासोबत वाद झाल्यामुळे अपमान सहन न होऊन विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी शेजारच्या कुटुंबातील चौघा जणांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. त्यातील आरोपी मायलेकांना सोमवारपर्यंत (5 मे) पोलिस कोठडी मिळाली आहे. पल्लवी रमेश भोसले (20) हिचे 30 एप्रिलला शेजारच्या काळे कुटुंबीयासोबत वाद झाले होते. त्यावेळी काळे कुटुंबीयानी तिला व तिच्या आईला अर्वाच्च भाषा वापरली. हा अपमान सहन न झाल्याने पल्लवीने रात्री गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. तिने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत दुपारच्या घटनेचा उल्लेख होता. त्यामुळे तिच्या पतीने कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी सुनंदा भीमराज काळे (45) व अमित भीमराज काळे (27) यांना अटक केली. शनिवारी त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. ए. गायकवाड यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडी सुनावली.