आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Matathi, Atrocities Issue At Nagar

मुलीवर अत्याचार; आरोपीला कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणा-या किसन गौतम माळी (19, जांबगाव, ता. पारनेर) याची रवानगी पोलिस कोठडीत झाली. 15 ते 24 जुलै या कालावधीत त्याने संबंधित मुलीला प्रेम असल्याचे सांगून पळवून नेले. पुण्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पारनेर पोलिसांनी किसनविरुद्ध गुन्हा नोंदवला. त्याला अटक करुन शुक्रवारी दुपारी जिल्हा न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्यासमोर हजर करण्यात आले. आरोपीने गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करायची आहे.
पुढील तपासाकरिता त्याला 7 दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अहिरे व अतिरिक्त सरकारी वकील सुरेश लगड यांनी केली. ती मान्य करत 28 पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.