आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपी खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष, खोटी फिर्यादप्रकरणी सक्तमजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- सहकाऱ्याचा खून करुन पोलिसांत खोटी फिर्याद देऊनही तपासात पोलिसांनी ठेवलेल्या त्रुटी आरोपीला फायद्याच्या ठरल्या. त्यामुळे आरोपी खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटला असून खोटी फिर्याद दिल्याप्रकरणी दोषी ठरला आहे. न्यायालयाने त्याला 2 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सोमनाथ बारकू भोर (३०, रेणवडी, ता. पारनेर) असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांनी बुधवारी हा निकाल दिला.

सोमनाथ भोर हा सचिन खजीन येवले आणि इतर तिघांसह १५० सभासदांचा चीट फंड चालवत होता. सर्व आर्थिक व्यवहार सोमनाथकडे, तर लेखी हिशेब सचिन ठेवत असे. दरवर्षी २५ मार्चला चीट फंड उघडून लोकांना टक्क्याने पैसे द्यायचे ठरले होते. पण सोमनाथने एका वर्षाचे पैसे एकट्याने वापरले. स्वत:ची लबाडी झाकण्यासाठी त्याने कट रचून सचिनच्या मृत्यूचा बनाव रचला. २६ एप्रिल २०१३ ला भिशी उघडण्याच्या दिवशी सोमनाथ सचिन रस्त्याने जात होते. सोमनाथने सचिनचा खून करुन चोरट्यांनी मारहाण करुन लुटल्याचा बनाव रचला.

पोलिसांत तशी फिर्याद देत पावणे आठ लाख रुपये लुटल्याचे दाखवले. तपासात सोमनाथच आरोपी असल्याचे समोर आले. त्यामुळे पारनेर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खुनाचा खोटी फिर्याद दिल्याचा गुन्हा नोंदवला. न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. सरकार पक्षातर्फे अॅड. पुष्पा कापसे-गायके यांनी काम पाहिले. त्यांनी एकूण १३ साक्षीदार तपासले, पण पोलिस निरीक्षक सुनील शिवरकर यांनी तपासात अनेक त्रुटी ठेवल्यामुळे न्यायालयाने सोमनाथला खुनाच्या गुन्ह्यात निर्दोष ठरवले अन् खोटी फिर्याद दिली म्हणून वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे वकील अॅड. गायके यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...