आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोफखान्यात परस्परविरोधी दरोडा, विनयभंगाचे गुन्हे दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिकेच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पाइपलाइन रस्त्यावर शिवसेना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या दोन गटांत तुफान राडेबाजी झाली. हा प्रकार सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास वाणीनगर कॉलनी एकविरा चौकात घडला. याप्रकरणी दोन्ही गटांनी तोफखाना पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत. त्यावरुन पोलिसांनी दरोडा, मारहाण, विनयभंगाचे गुन्हे नोंदवले आहेत. आरोपींमध्ये सेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. फिर्यादी देण्यासाठी दोन्ही गटांच्या वतीने मातब्बर नेत्यांनीही पोलिस ठाण्यात ठाण मांडले होते.

पहिली फिर्याद राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या पत्नीने दिली. त्या घरी असताना दुपारी बाळासाहेब नानासाहेब बारस्कर, माजी नगरसेवक सतीश नानासाहेब बारस्कर, सचिन नानासाहेब बारस्कर, किरण बारस्कर संकेत पुजारी हे तेथे आले. निवडणुकीतील कारणावरुन आरोपींनी फिर्यादीच्या पतीला, जावेला दिराला मारहाण केली. गळ्याला चाकू लावून सोन्याचे मंगळसूत्र रोकड काढून घेतली. नंतर शिवीगाळ, दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपींविरुद्ध दरोडा, विनयभंग, मारहाण करणे, धमकावणे आदी कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवला. तपास सहायक निरीक्षक राहुल गायकवाड करत आहेत.

दुसरी फिर्याद विरोधी गटाने दिली आहे. फिर्यादी महिला घरी असताना योगेश ठुबे, शिवाजी डोके, अंकुश चत्तर, तुषार यादव, कुलदीप भिंगारदिवे, गोट्या धाडगे तेथे आले. त्यांनी निवडणुकीच्या कारणावरुन धारदार शस्त्राचा धाक दाखवून विनयभंग केला. शिवीगाळ, दमदाटी मारहाण करत सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून घेतले जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपींविरुद्ध दरोडा, मारहाण करणे, विनयभंग, धमकावणे आदी कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवला. या दोन्ही फिर्यादी नोंदवताना पोलिस ठाण्यात कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक बजरंग बनसोडे पोलिस निरीक्षक अविनाश मोरे यांनी जमावाला पांगवले.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप महापौर अभिषेक कळमकर यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात सोमवारी दुपारी ठाण मांडले होते.