आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोषींना महापालिका प्रशासनाचेच अभय, चौकशी पूर्ण, तरी होईना फौजदारी कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मालमत्ता करात तब्बल ४३ लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यास महापालिका प्रशासन चालढकल करत आहे. मुख्य लेखापरीक्षक एस. एस. अनारसे यांनी या प्रकरणाची चौकशी करून आयुक्तांना अहवाल सादर केला. मात्र, आयुक्त विलास ढगे याप्रकरणी कोणतीच कार्यवाही करण्यास तयार नाहीत. प्रशांत लोंढे याच्याप्रमाणेच तब्बल १४८ कर्मचारी सात अधिकारीदेखील वेगवेगळ्या प्रकरणांत चौकशांच्या फेऱ्यात अडकले असून त्यांच्यावरही कारवाई करण्यात आलेली नाही.
महापालिकेच्या प्रभाग समिती कार्यालय मध्ये वसुली लिपिक म्हणून काम करणाऱ्या प्रशांत लोंढे याने ४३ लाख रुपयांचा अपहार केला. नागरिकांनी भरलेल्या कराचे पैसे त्याने मनपाच्या तिजोरीत भरलेच नाहीत. अपहार उघड झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे लोंढे याने अपहार केल्याची लेखी कबुलीच प्रशासनाकडे दिली. अपहार केलेली रक्कम त्याने मनपाच्या तिजोरीत जमा केली असली, तरी त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे. मनपा प्रशासन मात्र चौकशीचा फार्स करत लोंढे याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे. लेखापरीक्षक अनारसे यांनी या अपहार प्रकरणाची चौकशी करून अहवाल आयुक्त ढगे यांच्यासमोर ठेवला आहे. आयुक्त ढगे मात्र लोंढे याच्यावर कारवाई करण्यास तयार नाहीत. याप्रकरणी मनपा प्रशासन राजकीय दबावापुढे नतमस्तक झाले असल्याची चर्चा मनपा वर्तुळात सुरू आहे.

लोंढे याच्याप्रमाणेच मनपाचे तब्बल १४८ कर्मचारी अधिकारी चौकशांच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यांच्यावर कामातील अनियमितता गैरव्यवहारांचे आरोप आहेत. त्यांच्यावरील कारवाई टाळण्यासाठी महापालिका प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत आहे. त्यामुळे भविष्यात अपहार गैरव्यवहारांची संख्या वाढणार आहे. मालमत्ता करात ४३ लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या लोंढे याच्यावर कठोर कारवाई झाली, तर असे प्रकार पुन्हा समोर येणार नसल्याचे नगरकरांचे म्हणणे आहे. दरम्यान, नागरिकांनी भरलेल्या कराच्या रकमेचा अपहार करण्याचे प्रकार यापूर्वीही अनेकदा घडले आहेत. त्यांचीही चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे होते. तथापि, आयुक्तांनी त्याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही.

65- कर्मचाऱ्यांच्याचौकशा पूर्ण
148- कर्मचाऱ्यांवरआरोपपत्र
7- अधिकाऱ्यांच्याचौकशा रखडल्या

जबाबदार अधिकारीही अडकले
अभियंताआर. जी. सातपुतेसारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना महापालिका प्रशासन पदाधिकारी पाठीशी घालत आहे. शहर अभियंता नंदकुमार मगर, मुख्य लेखाधिकारी हितेश विसपुते, विद्युत विभागप्रमुख बाळासाहेब सावळे, उद्यान विभागप्रमुख िकसन गोयल, पाणीपुरवठा विभागातील अभियंता एम. डी. काकडे, व्ही. जी. सोनटक्के यांच्यासारखे जबाबदार अधिकारीदेखील चौकशांच्या फेऱ्यात अडकले आहेत.

चौकशी पूर्ण तरी कारवाई अजून नाही...
वर्ग मधील १४८ कर्मचाऱ्यांवर अनेक वर्षांपासून आरोपपत्र ठेवण्यात आलेले आहेत. त्यापैकी काही कर्मचाऱ्यांच्या चौकशा पूर्ण झाल्या आहेत. त्यांच्या चौकशीचा अहवाल आयुक्त उपायुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. परंतु वर्ष उलटले, तरी अद्याप एकाही कर्मचाऱ्यावर कारवाई झालेली नाही.

चौकशी अहवाल आयुक्तांना सादर
प्रशांतलोंढेयाने केलेल्या अपहार प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून महापालिकेच्या आयुक्तांना अहवाल सादर केला आहे. सर्व प्रभाग समिती कार्यालयांतील मालमत्ता कर वसुलीची तपासणी सुरू आहे. सावेडी प्रभाग समिती कार्यालयाची तपासणी पूर्ण झाली आहे.'' एस. एस. अनारसे, मुख्यलेखापरीक्षक.
बातम्या आणखी आहेत...