आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसाळ, गंभीर, ब्राह्मणेसह, तीन टोळ्यांच्या विरुद्ध मोक्काचा पोिलसांचा प्रस्ताव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पारनेर तालुक्यातील कुख्यात वाळूतस्कर गुंड प्रविण आनंदा रसाळ, बनावट दारुनिर्मिती करणारा जगजीतसिंग गंभीर वाडेगव्हाण गोळीबार प्रकरणातील आरोपी ईश्वर ब्राम्हणे, अशा तीन टोळ्यांविरुद्ध मोकाचे (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा) प्रस्ताव तयार केले आहेत. हे प्रस्ताव शनिवारी दुपारी पोलिस अधीक्षकांकडे सादर करण्यात आले. 

नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. त्यानंतर ते नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे सादर केले जाणार आहेत. निघोजचे माजी उपसरपंच संदीप वराळ यांच्या हत्या प्रकरणात फरार असलेल्या प्रविण आनंदा रसाळ याच्या टोळीविरुद्ध यापूर्वीही मोकाचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. मात्र, त्यामध्ये त्रुटी निघाल्याने तो मंजूर झाला नाही. 

आतापर्यंत पंधराहून अधिक जणांच्या मृत्युकांडाला जबाबदार असलेले बनावट दारूनिर्मिती रॅकेटमधील आरोपी जितू उर्फ जगजितसिंग गंभीर, जाकीर शेख इतरांविरुद्ध आता मोक्काचा प्रस्ताव तयार केला आहे. या आधीच पोलिसांनी प्रतिबंधक पावले उचलली असती, तर ही वेळ आली नसती. आता उशिराने पोलिस जागे झाले आहेत. 

या शिवाय वाडेगव्हाण येथे दीड महिन्यापूर्वी झालेल्या टोळीयुद्धातील आरोपींवरही मोक्काचा प्रस्ताव तयार केला आहे. या टोळीने निघोजचे संदीप वराळ यांची गेल्या महिन्यात हत्या केली होती. या टोळीची परिसरात दहशत आहे. त्यामुळे पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. 
बातम्या आणखी आहेत...