आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोफखाना पोलिसांकडून 27 गुन्ह्यांची उकल; 23 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांकडून हस्तगत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल घरफोड्या करणा-यांना अटक करून त्यांच्याकडून 11 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. याशिवाय मंगळसूत्र चोरी, चंदनचोरी, जबरी चोरीच्या विविध गुन्ह्यांसह एकूण 27 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करुन आतापर्यंत 4 लाख 14 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. तोफखाना पोलिसांनी 23 जुलैला अट्टल घरफोड्या करणारा बबलू ऊर्फ लड्ड्या रहेमान शेख (27, ढवणवस्ती, नगर) व त्याचा साथीदार जमीर शेख यांना अटक केली होती. या दोघांनी व त्यांच्या इतर साथीदारांनी सावेडी उपनगरामध्ये एकूण 16 ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यापैकी 4 लाख 29 हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. या आरोपींनी जळगाव जिल्ह्यात केलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचीही कबुली दिली.
सावेडी उपनगरात धूमस्टाइलने महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व दागिने चोरणा-या टोळीवर पोलिसांनी पाळत ठेवली. यातील अरुण बाळासाहेब घुगे (19) व शक्ती सुनील सोत्रे (27, दोघे रेल्वे स्टेशन) यांना अटक केली. त्यांच्याकडून मंगळसूत्र चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आणले व 1 लाख 45 हजार रुपयांचे सोने हस्तगत केले आहे. रिक्षाचालक दीपक तात्या थोरात (औरंगाबाद) यालाही पोलिसांनी अटक केली. त्याने अविनाश सोनी यांच्या गळ्यातील चोरून नेलेली चेन पोलिसांनी हस्तगत केली. ट्रकचालकांना अडवून त्यांच्याकडून पैसे काढून घेणा-या टोळीतील आरोपी बाळू श्याम वाघमारे (50) व हरिभाऊ महादेव दिवटे (52) यांनाही अटक केली. काही दिवसांपूर्वी उपनगरात चंदनचोरीचे गुन्हे झाले होते. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी 3 चंदनचोर व चंदनाची वाहतूक करणारे 2 आरोपी अटक केले. त्यांच्या ताब्यातून सुमारे 7 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
कोतवाली पोलिसांनी आवळल्या 27 आरोपींच्या मुसक्या
कोतवाली पोलिसांनी विविध गुन्ह्यांतील 27 आरोपींच्या मुसक्या आवळल्या. यामध्ये मेहंदी युसूफ सय्यद, बाकरअली अहमदअली शेख, जावेदअली हुसेनअली शेख, हैदर मुसा इराणी, गुलाम पारुअली सय्यद, फिरोज फयाज खान, अबुजरअली अबुहैदरअली, अली अकबर हुसेन इराणी, मुस्तफा शब्बीरअली जाफरी, अब्दुल जब्बार सय्यद, बिलाल सिराज जाफरी, सावर रजा सय्यद, प्रताप भगवान गायकवाड, मुक्तेश्वर शिवाजी निमसे, चाँद सलीम सय्यद, अंकुश नामदेव भोरे, कृपालसिंग मानवतसिंग गुजर, बंटी राघवेंद्र अजमेरसिंग राजपूत, रवी भगवानदास वर्मा, आमीर सलीम बेग, राजकुमार जानकीसिंग राजपूत, प्रदीप शिवाजी सोनटक्के, प्रवीण लहू कोचेकर, विजो विलसेंट यांचा समावेश आहे.