आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंड अमोल कर्डिले पुन्हा गजाआड, पोलिसांच्या हातावर तुरी देऊन झाला होता पसार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या कुख्यात गुंड पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटल्यानंतर तब्बल महिन्यांनी त्याला पुन्हा पकडण्यात यश अाले. अमोल भाऊसाहेब कर्डिले (कुरुंद, ता. पारनेर) असे या आरोपीचे नाव आहे. २५ एप्रिलला न्यायालयीन कामकाजासाठी त्याला नगरला आणण्यात आले होते. माघारी नेत असताना सुप्यात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो पळून गेला होता. अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुप्याचे पोलिस निरीक्षक श्याम सोमवंशी पारनेर पोलिसांच्या पथकाने सोमवारी त्याला गजाआड केले.

खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या कर्डिले याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती. २५ एप्रिलला सुप्यात लघुशंकेचा बहाणा करून तो पळून गेला, असे सुुरुवातीला सांगण्यात आले. पण नंतर वेगळीच माहिती समोर आली. मद्यप्राशन केलेल्या पोलिसांना चकवून अमोल त्याच्या मैत्रिणीबरोबर अतिशय सहजगत्या पळून गेल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी चौकशी केल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी पारनेरचे पोलीस कुंडलिक आरवडे रवींंद्र कुलकर्णी यांना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत तत्काळ निलंबित केले होते.

कर्डिलेच्या शोधासाठी तपास पथके रवाना झाली. गुन्हे शाखेचे पोलिसही त्याच्या मागावर होते, पारनेरमधील चार-पाच मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. नगर न्यायालयातून पोलीस अमोलसह थेट गव्हाणवाडी येथेच गेल्याचा जबाब काही प्रत्यक्षदर्शींनी दिला. यामुळे या प्रकरणाने वेगळीच कलाटणी घेतली. कर्डिले याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, जबरी चोऱ्या आदी प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
बातम्या आणखी आहेत...