आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Criminal Case Filed Against Seven Standard\'s 11 Children In Sangamner

सातवीतील ११ मुलांवर वर्गमित्राच्या हत्येचा गुन्हा, मुलीकडे पाहण्यावरून मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - मुलीकडे पाहिल्याच्या कारणावरून वर्गमित्रांनी केलेल्या मारहाणीत विद्यार्थ्याला जीव गमवावा लागल्याच्या राजापूर येथील घटनेप्रकरणी पोलिसांनी ११ विद्यार्थ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. किरण गोरक्ष सोनवणे (१३) असे मृत मुलाचे नाव आहे.

राजापूरच्या नूतन विद्यालयात किरण सोनवणे सातवीत शिकत होता. मुलीकडे पाहिल्याच्या कारणावरून त्याला वर्गमित्रांनी मधल्या सुटीत दोन दिवस मारहाण केली. यामुळे किरणला रात्री उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्याची दातखिळी बसली आणि चक्कर येऊ लागल्याने त्याला खासगी रुग्णालयात आणले. तेथून नाशिकला हलवण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला. उपनिरीक्षक अन्सार शेख यांनी वैद्यकीय तपासणीचे अहवाल मिळवत अकस्मात मृत्यूची नोंद केली.

दरम्यान, आठ दिवस उलटूनही कोणी फिर्याद देण्यासाठी येत नसल्याने पोलिसांनी स्वत: फिर्यादी होण्याचा निर्णय घेतला. मग किरणची आई रोहिणी गोरक्ष सोनवणे (रा. राजापूर) यांनी मंगळवारी दुपारी फिर्याद दिली. पोलिसांनी दहा-अकरा विद्यार्थ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. यापैकी पाच विद्यार्थ्यांची नावे प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहेत.

‘आरोपी बारा ते तेरा वयोगटातील असल्याने हे प्रकरण काळजीपूर्वक हाताळत आहाेेत. पुरावे गोळा करणे पहिले काम आहे. पाच मुलांची नावे निष्पन्न झाली. अजून पाच-सहा विद्यार्थ्यांचा शोध घेत आहोत’, असे पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी सांगितले.

डोके भिंतीवर आदळले
वर्गातीलमुलींकडे का पाहतो, असे म्हणत किरणला २५ २६ जूनला इंटरव्हलमध्ये त्याच्या वर्गमित्रांनी मारहाण केली. त्याचे डोके भिंतीवर, झाडावर बेंचवर आदळण्यात आले. किरणने आईला हा प्रकार सांगितला. मात्र, मुलांची भांडणे होतच असतात, असे वाटून तिने दुर्लक्ष केले. २६ रोजी रात्री त्याला उलट्या झाल्या. नाशिकला रुग्णालयात हलवल्यावर चार दिवसांनी किरणचा मृत्यू झाला.