आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Criminal Murdered In Kopargaon, Filed Chargsheet Against Seven People

जामिनावर सुटलेल्या गुंडाची कोपरगावात हत्या, सात जणांवर गुन्हे दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोपरगाव - महिलेची छेडछाड व मारामारीप्रकरणी जामिनावर सुटलेला गुंड राजेंद्र सूर्यभान आहेर (27, बँक कॉलनी) याची रविवारी तलवार, चॉपर व लोखंडी रॉडने हल्ला करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी 7 जणांवर गुन्हे दाखल करून दोघांना अटक झाली आहे.
राजेंद्रने 4 जानेवारीला राजू पंजाबीच्या आईचा विनयभंग केला होता. या प्रकरणी त्याला अटक झाली होती. रविवारीच त्याची सुटका झाली. सायंकाळी सोमनाथ वायकर (गोविंदनगर), दिनेश पवार, राहुल शिरसाठ, कैलास सीताराम सोमासे (24, खडकी), सचिन बागुल (नवले वस्ती), राजू पंजाबी, अजय डावखर (बँक कॉलनी) यांनी राजेंद्रची हत्या केली.
घटनेची माहिती समजताच सहायक पोलिस निरीक्षक राहुल पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मोबाइल व चप्पल आढळून आली. मृत राजेंद्रचा भाऊ बापू ऊर्फ चंद्रकांत सूर्यभान आहेर याच्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दिनेश मधुकर पवार (30, खडकी), कैलास सीताराम सोमासे (24) या दोघांना पोलिसांनी सोमवारी अटक केली.
राजेंद्रवर 14 गुन्हे
मृत राजेंद्रवर खून, दमबाजी, चेन स्नॅचिंग, रस्ता लूट, मारामारी, दहशत पसरवणे असे विविध 14 गुन्हे दाखल होते.