आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

52 रस्त्यांच्या कामांत कोट्यवधींचा गफला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - वेगवेगळ्या निधीतून पूर्ण करण्यात आलेल्या काही मंजूर असलेल्या रस्त्यांच्या कामांचे नव्याने अंदाजपत्रक तयार करून कोट्यवधी रुपयांचा गफला करण्यात आला आहे. अधिकारी ठेकेदाराने संगनमत करून शहरातील ५२ रस्त्यांच्या कामात हा घोटाळा केला आहे, असा आरोप नगरसेवक कैलास गिरवले यांनी बुधवारी सभागृहात केला.

शहरातील वेगवेगळ्या ५२ रस्त्यांच्या कामांत मोठा गैरव्यवहार झाला असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी गिरवले यांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार केली आहे. मात्र, याप्रकरणी प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे संतापलेल्या गिरवले यांनी बुधवारी झालेल्या महासभेत थेट आयुक्त दिलीप गावडे यांनाच आव्हान दिले. या कामांची चौकशी केल्यास तुम्हाला २५ हजार रुपयांचे बक्षीस देईन, असे गिरवले म्हणाले. ज्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत काही रस्त्यांची कामे मंजूर आहेत, अशा रस्त्यांच्या कामाचे पुन्हा नव्याने अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी अनेक कामांची बिले ठेकेदाराला देण्यात आली आहेत. महापालिकेचे अभियंते संबंधित ठेकेदारांनी संगनमत करून हा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप गिरवले यांनी केला.
अनभुले हॉस्पिटल ते प्रेमदान हडको चौकापर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरण काँक्रिटीकरणासाठी २४ लाख ९८ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला. याच रस्त्यावरील प्रोफेसर कॉलनी चौक ते हॉटेल संस्कृतीपर्यंतच्या रस्त्यासाठी २४ लाख ९९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. प्रोफेसर कॉलनी चौक ते तोफखाना पोलिस ठाण्यापर्यंतच्या रस्त्यासाठी २४ लाख ९६ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, या रस्त्याचे काम रिलायन्सच्या निधीतून झाले असून ठेकेदाराचे बिलही देण्यात आले आहे. सनमून चौक ते गाडगीळ पटांगणपर्यंतच्या रस्त्याच्या एक लाख ९३ हजार रुपये खर्चाच्या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे, परंतु हे काम पुन्हा मूलभूतच्या निधीतून घेण्यात आले आहे. शिवाय सनमून चौक ते गाडगीळ पटांगण ते अमरधामपर्यंतच्या रस्त्यासाठी पुन्हा १६ लाख ३१ हजारांची तरतूद करून कामाचा कार्यारंभ देण्यात आला. वेगवेगळ्या ५२ रस्त्यांच्या कामात असाच गैरव्यवहार करण्यात आला असल्याचे गिरवले यांनी सांगितले.

याप्रमुख रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार
प्रेमदानचौक ते प्रोफेसर कॉलनी चौक, प्रभाग मधील सनमून चौक ते गाडगीळ पटांगण, केडगावमधील शाहूनगरमधील रस्ते, केडगावमधील एकनाथनगर शिवाजीनगर, प्रभाग २८ मधील शिवनेरी चौक ते विरंगुळा मैदान, सबलोक पेट्रोलपंप ते सर्जेपुरा हरिजन वस्ती, प्रभाग २७ मधील सरस्वती मंगल कार्यालय ते जाधव घर, प्रभाग ११ मधील एलआयसी कॉलनी ते अंतर्गत रस्ते, समर्थ शाळा ते प्रोफेसर कॉलनी चौक, महात्मा फुले चौक ते सारसनगर भिंगारनाला, प्रभाग २९ मधील भवानीनगर अंतर्गत रस्त्यांची कामे, प्रभाग १० मधील गोविंदपुरा नाका ते गुरुद्वारा चौक.

महापालिकेचे आर्थिक नुकसान : शिंदे
गिरवले यांनी सांगितलेल्या रस्त्यांच्या कामात मोठा गैरव्यवहार झाला आहे. महापालिकेचे त्यात मोठे अार्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांनी केली. आयुक्त गावडे यांनी या प्रकरणाची चौकशी अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांच्यामार्फत चौकशी करून सविस्तर अहवाल सभागृहात ठेवण्यात येणार असल्याचे सभागृहात स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...