आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोट्यवधींचा महसूल बुडवल्याने 101 अधिका-यांविरुद्ध खंडपीठात याचिका दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे - नेवासा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या विकासकामांच्या बिलामधून शासकीय करांची कपात न केल्यामुळे कोट्यवधींचा महसूल बुडाला आहे. हा प्रकार माहितीच्या अधिकारात उघडकीस आला. त्यामुळे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सचिव दीपक धनके यांनी ग्रामविकास सचिवासह 101 जणांविरुद्ध औरंगाबाद
खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.

यामध्ये नगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्यासह ग्रामसेवकांवर कर न वसूल केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. रस्ते, गटारे आदी कामांत ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवकाच्या संगनमताने गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळे ही कामे निकृष्ट दर्जाची होत आल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या कामासाठी वापरण्यात येणारी वाळू, दगड, मुरूम यांची रॉयल्टी ठेकेदारांकडून कधीही भरण्यात आलेली नाही. तसेच शासकीय नियमांप्रमाणे या कामांची बिले अदा करताना व्हॅट, इन्कम टॅक्स, सेलटॅक्स, सिक्युरिटी डिपॉझिट यांची कपात केलेली नाही.