आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चलनी नोटांवर दोन नवीन सुरक्षा वैशिष्ट्ये, सहज ओळखू येईल अशा खुणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर; चलनी नोटांची अचूकता वाढून बोगस नोटांना आळा बसवण्यासाठी रिझर्व्ह बँकने दोन नवीन सुरक्षा वैशिष्ट्ये चलनी नोटांवर छापण्यास सुरुवात केली आहे.

यासंदर्भात माहिती देताना जामखेड येथील नाणी नोटा संग्राहक पोपटलाल हळपावत म्हणाले, नोटांवरील क्रमांक छापण्याच्या पद्धतीत आता बदल करण्यात आला आहे. दोन्ही पॅनेलवरील आकड्यांच्या आकारात डावीकडून उजवीकडे वाढ होत गेलेली आता दिसते. दृष्टिदोष असलेल्या व्यक्ती सहज ओळखू शकतील अशा काही खुणा नव्या नोटांवर करण्यात आल्या आहेत.
नोटांच्या पृष्ठभागावर डाव्या उजव्या बाजूला तिरप्या ब्लीड रेषा दिसतात. शंभर रुपयांच्या नोटेवर चार रेषा, पाचशेच्या नोटेवर पाच रेषा, तर एक हजारच्या नोटेवर सहा ब्लीड रेषा आहेत. शंभराच्या नोटेवर त्रिकोण, पाचशेमध्ये वर्तुळ, तर एक हजारच्या नोटेवर हिरा आहे. यापूर्वी चलनात आणलेल्या नोटाही वैध असतील, असे हळपावत यांनी सांगितले.
जामखेड येथील संग्राहक पोपटलाल हळपावत यांच्याकडील ५०० रुपयांची नवी नोट. या नोटेवर नवीन सुरक्षा चिन्हे आहेत.