आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्त धान्य वितरणात मोठ्या प्रमाणात काळाबाजार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - गोरगरिबांनास्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यासाठी येणारे काळ्याबाजारात सर्रासपणे जात असल्याचे जिल्ह्यातील चित्र उघड करणारे प्रकरण गेल्या आठवड्यात समोर आले. श्रीगोंदे येथे जाणारे ३४ टन धान्य असलेले ट्रक ठेकेदारामार्फत परस्पर दुसरीकडेच गेले. हे ट्रक श्रीगोंद्याला गेल्याचे भासवून रंगवलेली विसंगत कागदपत्रे उघडकीस आल्यानंतर तिस-या दिवशी श्रीगोंद्यात ३४ टन धान्य पोहचले. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी तक्रारदार वसंत ठुबे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
वखार महामंडळाच्या शहरातील गोदामातून ३० जून रोजी एमएच १६ ईई ९०११ एमएच १६ ए. ५५१५ या क्रमांकाचे दोन ट्रक प्रत्येकी १७ टन प्रमाणे ३४ टन धान्य घेऊन बाहेर पडले. हे धान्य श्रीगोंदे येथील शासकीय गोदामात पोहोचणे अपेक्षित होते. रात्री वाजून ५५ मिनिटांनी या दोन्ही ट्रकचे वजन नगर-पुणे रस्त्यावरील श्री वजन काट्यावर करण्यात आले. भरलेल्या धान्यासह हे वजन करण्यात आले. त्यानंतर या दोन्ही ट्रक श्रीगोंद्याला रवाना झाल्याचे भासवण्यात आले. श्रीगोंद्यातील शासकीय गोदामात अन्नधान्य खाली करून दोन्ही ट्रक त्याच दिवशी रात्री १२ वाजता श्री वजन काट्यावर परत आल्या. रात्री सव्वा बाराच्या सुमारास दोन्ही रिकाम्या ट्रकचे श्री वजन काट्यावर पुन्हा वजन झाले.

वाहतुकीचा ठेका पुन्हा त्याच ठेकेदाराला का ?
वेळेवरधान्य पोहचणे, वाहतूक दरातील कमी-जास्तपणा आदी कारणामुळे अन्न-धान्य वाहतूक करणा-या ठेकेदार भगवान हरबा यांचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव यापूर्वी पाठवला होता. तत्कालीन पुरवठा अधिकारी कासार यांनीच हा प्रस्ताव पाठवला होता. मात्र पालकमंत्री राम शिंदे यांनी या त्याच ठेकेदाराला वाहतुकीचे काम करण्याचे निर्देश दिल्याची माहिती सू़त्रांनी दिली. याच ठेकेदारावर मेहेरबानी का? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

पुरवठा मंत्र्यांकडे तक्रार करणार
अहमदनगरहूननिघालेले स्वस्त धान्यांनी भरलेले ३४ टनाचे दोन ट्रक श्रीगोंदे येथील गोदामात त्या दिवशी पोहोचलेच नाहीत. ते ट्रक तब्बल तिस-या दिवशी पोहोचले. याबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर दोन ट्रक नादुरुस्त झाल्याचे कारण ठेकेदाराने दिले. जिल्हा पुरवठा विभागानेही शंका घेता ते मान्य केले. हे सर्व प्रकरण संशयास्पद आहे. यात काही राजकीय नेते, ठेकेदार अधिकारी गुंतले आहेत. स्थानिक प्रशासनाकडून कारवाई झाल्यास थेट राज्याचे अन्न पुरवठा मंत्री गिरीष बापट यांच्याकडे तक्रार करण्यात येईल. '' वसंतठुबे, सामाजिककार्यकर्ते

ठेकेदाराची मनमानी
स्वस्तधान्य दुकानदारांपर्यंत धान्य पोहोचवण्यासाठी प्रतिगोणी रुपये वाहतूक ठेकेदाराला दुकानदारांकडून अदा करण्यात येतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून दरांबाबत ठेकेदाराने वाढीव रुपये देण्याचा तगादा दुकानदारांकडे लावला आहे. ऐवजी प्रतिगोणी १२ रुपये दुकानदारांकडून काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.