आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Customer Awakening Lessons In Syllabus Issue At Nagar

लवकरच पाठ्यपुस्तकांतून देणार ग्राहक जागृतीचे धडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - ग्राहकांमध्ये जागृती व्हावी, ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, यासाठी इयत्ता सातवी, आठवी व नववीच्या पाठ्यपुस्तकांत ग्राहक हक्कांचा समावेश करण्याचा विचार आहे. तशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य शासनाच्या ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत गवळी यांनी सोमवारीदिली.
गवळी यांनी ग्राहक संरक्षण समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. नंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्हा पुरवठा अधिकारी सोपान कासार, ग्राहक सल्लागार समितीच्या सहायक अधिकारी िस्मता नाेरटेन आदी यावेळी उपस्थित होते.
गवळी म्हणाले, भारतीय ग्राहकदिन २४डिसेंबरला आहे. यादिवसापर्यंत राज्यातील सर्वजिल्हा ग्राहक संरक्षण समित्या गठित झाल्या पाहिजेत. ग्राहक चळवळ सर्वांची आहे. ती पुढे नेण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील. त्यासाठी सुसंवाद व समन्वय ठेवला जाईल. ग्राहक चळवळ ही यंत्रणा सुधारण्याची चळवळ आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी २४डिसेंबरला ग्राहकदिनी राज्याचे ग्राहक धोरण जाहीर करावे, अशीविनंती त्यांना करण्यात येणार आहे.
१९८६ पासून ग्राहक संरक्षण कायदा अन्न व नागरी पुरवठाविभागाशी जोडला गेला आहे. आता ग्राहकांच्या प्रश्नांबाबत स्वतंत्र खातेविकसित होणे गरजेचे आहे. या खात्याला स्वतंत्र कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री व वेगळी शासकीय यंत्रणा असणे गरजेचे आहे. ग्राहक दिन वगळता जिल्‍हात ग्राहक संरक्षण समितीची महिन्यातूनि‍कमान एक बैठक व्हावी, त्याचबरोबर ग्राहकदिनासाठी एक वार निश्चित केला गेला पाहिजे. तालुकास्तरावर ग्राहक दूत किंवा ग्राहक संपर्क अधिकाऱ्याचीनियुक्ती झाली पाहिजे. ग्राहक कल्याण नवनीत हे पुस्तक घराेघर देण्यात येणार असून, त्याचे मूल्य एक रुपया अाहे, असे गवळी यांनी सांगितले.
चित्रपट उशिरा सुरु झाला तरी तक्रार कराv
- चित्रपटगृहात राष्ट्रगीतानंतर लगेच, मध्यंतरातकिंवा चित्रपट संपल्यानंतर ग्राहक प्रतिज्ञा सक्तीनेे दाखवली पाहिजे. लोकप्रतिनिधींच्या शपथविधीनंतरही ग्राहक प्रतिज्ञा सक्तीची व्हावी. चित्रपटगृहात चित्रपट उशिरा सुरु झाला, तरी ग्राहक संरक्षण परिषदेकडे तुम्हाला लगेच तक्रार करता येईल.''