आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देश-विदेशातील मिठायांनी सजली नगर शहरातील दालने, ग्राहकांची गर्दी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कोणताही सण आणि मिष्टान्नाचे घट्ट नाते असते. भारतीय सणंत सर्वांत मोठा सण असतो, तो दिवाळीचा. दिवाळीचे गोडाशी अधिक घट्ट नाते आहे. कारण ही मिठ्ठास वाटून खाण्याची दिवाळीची परंपरा आहे. त्यामुळे दिवाळीचा सण अधिक गोड करण्यासाठी नगरमधील मिठाईची दुकाने सजली आहेत.
 
विशेष म्हणजे या वर्षी मलेशिया, इंडोनेशिया तुर्कस्तानातील मिठाईच्या कंपन्यांनी दिवाळीच्या निमित्ताने आपली चॉकलेटस भारतीय बाजारात उतरवली आहेत. या सर्व वस्तू एका छत्राखाली या मॉलच्या व्याख्येप्रमाणे नगरमध्ये गुलमोहोर रस्त्यावरील बन्सीमहाराज अन्नपूर्णा सारखे मिठाईचे मॉलवजा दालने नगरमध्ये आहेत. तेथेही ग्राहकांची गर्दी मावत नाही, अशी स्थिती आहे. 
 
नगरच्या मिठाईचे खास वैशिष्ट्य आहे. कारण नगर जिल्हा दूध उत्पादनात राज्यात आघाडीवर आहे. दुधाच्या मुबलकतेमुळे येथील शेतकरी खवा बनवण्यात आघाडीवर आहेत. नगर शहरापासून अवघ्या २२ किलोमीटरवरील आष्टी तालुक्यातील दौला वडगावसारखी गावे खवा बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे नगरमध्ये मिळणारी खव्याची मिठाई अतिशय प्रसिद्ध आहे. नगरमध्ये बन्सीमहाराज, बन्सीमहाराज अन्नपूर्णा, बम्बई मिठाईवाला, महेंद्र पेडावाला, लोकसेवा स्वीटस, अर्चना स्वीटस, ओम स्वीटस, मुंजोबा स्वीटस अशी मिठाईची मोठी दुकाने आहेत. दीपावलीनिमित्त या सर्व मिठाईच्या दालनांमध्ये मिठायांचे विविध प्रकार ग्राहकांना भुरळ घालत आहेत. अलीकडील काळात खव्यातील भेसळीमुळे लोक ब्रँडेड काजूपासून बनवलेल्या मिठायांना अधिक पसंती देत आहेत. 
 
बन्सीमहाराज मिठाईच्या दालनात सध्या चौथी पिढी कार्यरत आहे. या पिढीचे प्रतिनिधी असलेले संचालक गोविंद जोशी म्हणाले, आमच्याकडे असलेल्या पारंपारिक मिठायांत मँगो, अंजिर, गुलकंद, स्ट्रॉबेरी, आॅरेंज, मिल्क केक, पिस्ता, चॉकलेट, बटर स्कॉच, बोर्नव्हिटा हे बर्फीचे प्रकार, तसेच काजूपासून बनवलेल्या मिठायांत काजू कतली, केशर कतली, काजू रोल, अंजिर कतली, काजू पाक खास अशा काजू गजक, काजू बाईटस यांचा समावेश आहे. या शिवाय आम्रखंड, बासुंदी, रसमलाई गुलाबजाम, साजूक तुपातले मोतीचूर लाडू, बंगाली मिठायांत पाकिजा, राजभोग, चमचम, संदेश ही आमची खासीयत आहे. दिवाळीच्या दिवसांत लोक तीन दिवसांत तीन मिठायांची खरेदी करतात. या शिवाय आम्ही दिवाळीचे चकली, अनारसे, करंजी, पाकातले चिरोटे, चिवडा, विविध चवींचे शेव, अनारसेबेसन लाडू आदी ३६ प्रकारचे हे पारंपारिक फराळाचे पदार्थ तयार करतो. त्यांना मोठी मागणी असते. 
 
अलीकडील काळात दिवाळीच्या दिवसांत भेट देण्यासाठी सुकामेव्याच्या आकर्षक पॅकिंगला मोठी मागणी असते. त्यासाठी खास आकर्षक आमच्याकडे १२५ प्रकारचे बॉक्स उपलब्ध आहेत, अशी माहितीही जोशी यांनी दिली. दुकानांत ग्राहकांची गर्दी होत आहे. 
 
बड्या कंपन्याही उतरल्या मैदानात 
पारंपरिकमिठायांबरोरच अमूल, ब्रिटानिया कॅडबरी, नेस्ले, फेरोरो रोशेरो (इटाली), टायस बिसिकॉप हे इंडोनेशियन, टाईम सोरे हे टर्किश, टॉब्लोरॅनो हा स्वीस, वॉशिले सफायर हे मलेशियन हे ब्रँडही दीपावलीच्या मिठाईच्या बाजारात पूर्ण ताकदीने उतरले आहेत. या हैदराबादची कराचीवाला बेकरी, मॉजिनिस ही केक बनवणारी कंपनीही दिवाळीनिमित्त खास उत्पादने घेऊन बाजारात उतरल्या आहेत. या कंपन्यांनी विविध प्रकारच्या आकर्षक पॅकिंगमध्ये आपली उत्पादने आणली आहेत. भेट देण्यासाठी त्यांना मोठी मागणी आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...