आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहक आर्थिक साक्षर होणे गरजेचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्र चालकांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिरात बोलताना स्टेट बँकेचे रिजनल मॅनेजर एल. डी. चौधरी. )
नगर- प्रत्येकनागरिकाचे बँकेत खाते असावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन-धन ही योजना सुरू केली. केंद्राच्या बँकेच्या विविध योजना सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचाव्या, ज्यामुळे प्रत्येक ग्राहक हा आर्थिक साक्षर होईल, असे प्रतिपादन स्टेट बँकेचे रिजनल मॅनेजर एल. डी. चौधरी यांनी केले.
येथील हॉटेल थापरमध्ये नुकतेच भारतीय स्टेट बँकेच्या जिल्ह्यातील ग्राहक सेवा केंद्र चालकांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिरात चौधरी बोलत होते. यावेळी मुख्य प्रबंधक फावडे, रिजनल मॅनेजर बी. झेड. बंब, मुख्य प्रबंधक डी. आर. धसाळ, प्रबंधक तथा जिल्हा समन्वयक के. एस. चिंते, सोमदत्त ससे, पे पॉइंट इंिडयाचे सुब्रोनाथ हुसेन शाह आदी उपस्थित होते.
या प्रशिक्षणात ग्राहक सेवा केंद्र चालकाची भूमिका काय, ग्राहक सेवा केंद्राकडून ग्राहकांसाठी कोणत्या सेवा दिल्या जातात, त्या सेवांबद्दलची संपूर्ण माहिती या सर्व सेवा नियमाप्रमाणे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात याव्यात, यासाठी जनजागृती करण्यात यावी. याबाबत माहिती देण्यात आली.

स्टेट बँकेच्या क्षेत्रिय व्यवसाय कार्यालयातर्फे या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण फावडे यांनी दिले, तर मार्गदर्शन चिंते यांनी केले. आभार जिल्हा व्यवस्थापक अमोल जवणे (साई एजन्सी) यांनी मानले.

सर्वाधिक ग्राहक नगर शहरामध्ये
पेपॉइंट इंडिया सेवा केंद्राचे सर्वाधिक ग्राहक नगरमधील आहेत. अधिक माहितीसाठी नवीन ग्राहक सेवा केंद्राच्या नोंदणीसाठी साई एजन्सी (९६२३४८८०८८), आिदती अपार्टमेंट, रेणावीकर शाळेसमोर, सावेडीनाका येथे संपर्क साधावा.
जागृती

ग्राहक आर्थिक साक्षर होणे गरजेचे