आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सोशल’ व्हा; पण जरा जपूनच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराची बदनामी करणारा मजकूर ‘व्हॉटस्अँप’वर टाकल्याबद्दल पुण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. अभिनेता आमिर खान याच्या ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमाची बदनामी केल्याबद्दल मुंबई पोलिसांच्या ‘सायबर सेल’ने गुन्हा नोंदवला. जामखेड पोलिस ठाण्यात ‘व्हॉट्सअँप’वरून धार्मिक भावना दुखावल्या म्हणून गुन्हा दाखल झाला. नेवाशातही असाच प्रकार घडला. त्याबाबत पोलिसांनी ‘सायबर सेल’चे मार्गदर्शन मागितले आहे, तर कोतवाली पोलिस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्या म्हणून ‘सायबर गुन्हा’ नोंदवण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष, पदाधिकार्‍यांच्या विरोधात चिखलफेकीचे प्रकार वाढले आहेत. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. तसे होऊ नये, म्हणून ‘सायबर सेल’ला अधिक सतर्क राहावे लागणार आहे. इंटरनेटवरील माहिती नेहमी 100 टक्के खरी आहे किंवा नाही, याचा अंदाज लावणे कठीण असते. बर्‍याचदा गंमत म्हणून सोशल नेटवर्किंगवर पाठवलेल्या मजकुरामुळे दुसर्‍याच्या भावना दुखावणे, हा सायबर गुन्हा ठरत आहे. काही प्रकरणात गुन्हे दाखल होतात; पण आरोपींना पकडण्याचे व त्यांना होणार्‍या शिक्षेचे प्रमाणही कमी आहे. म्हणून ‘सोशल’ होताना आचारसंहितेची गरज भासत आहे.
‘सोशल’ होताना..
कोणत्याही पोस्टला ‘लाइक’ व ‘कमेंट’ करण्यापूर्वी विचार करावा, अतिशय रागात किंवा दु:खी असाल तर ऑनलाइन जाणे टाळावे, ऑनलाइन मैत्री करताना काळजी घ्यावी, अनोळखी व्यक्तीचे प्रोफाइल तपासून मैत्री करावी, अनोळखी ऑनलाइन मित्रांना एकट्याने भेटणे टाळावे, कंटाळवाणे वाटते म्हणून ‘सोशल नेटवर्किंग’ हा पर्याय नव्हे, इंटरनेट वापरताना धोका किंवा अप्रिय घटना जाणवल्यास पालकांशी चर्चा करावी, इंटरनेटचा वापर करण्यास वेळेची र्मयादा ठेवावी, इंटरनेटवर स्वत:ची अनावश्यक माहिती देणे टाळावे, पासवर्ड कोणासोबतही शेअर करू नये. पासवर्ड अवघड व सतत बदलता असावा, अनोळखी लोकांशी मोबाइलवर बोलणे शक्यतो टाळावे, गरज नसताना ‘ब्ल्यू टूथ’चा वापर टाळावा.