आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचाही दाभोलकर करू : अण्णांना धमकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर- तुमचा दाभोलकर करू, अशी धमकी देणारे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी संबंध तोडण्याचीही धमकी देतानाच राळेगणमध्ये राहा, असेही अण्णांना धमकावण्यात आले आहे. या प्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात भादंवि ५०६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या पत्रावरील टपालाचे शिक्के अस्पष्ट असल्याने ते नेमके कोठून आले हे कळत नसल्याचे पोलिस सूत्रांनी म्हटले आहे. तथापि, प्रकरणाचा तपास सुरू आहे.