आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दादा कोंडके चित्रमहोत्सव गौरवास्पद, चित्रपट महामंडळाचे भुरके यांचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर जिल्ह्याने अनेक दिग्गज कलावंत घडवले अाहेत. दादा कोंडके चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने नगरी सिनेमाच्या माध्यमातून चित्रपट व्यवसायासाठी हा जिल्हा असेच योगदान देत राहील, असा विश्वास अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे कार्यवाह सुभाष भुरके यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नगरी सिनेमाच्या संयुक्त विद्यमाने महेश चित्रमंदिरात आयोजित शाहीर दादा कोंडके चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर होते. सतीश बीडकर, दिलीप दळवी, अतुल आेहाळ, माजी महापौर भगवान फुलसौंदर, संजय कळमकर,दिलीप वाकचौरे, रामेश्वर मणियार, कवित्री रिता जाधव-राठोड आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी दिलीप दळवी, अतुल आेहोळ यांचीही भाषणे झाली. चित्रपट महामंडळाच्या वतीने नगरी सिनेमाला २५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. प्रास्ताविक भगवान राऊत यांनी केले. सूत्रसंचालन उमेश घेवरीकर यांनी केले, तर आभार राज भालेराव यांनी मानले. या महोत्सवाची सांगता रविवारी (२४ मे) सायंकाळी वाजता ज्येष्ठ अिभनेत्री सरला येवलेकर चित्त्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात दादा कोंडके यांचे चित्रपट पहायला मिळतील.
बातम्या आणखी आहेत...