आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण्यांकडून दहीहंडी उत्सव "हायजॅक'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दहीहंडी उत्सवात सेलिब्रेटींच्या उपस्थितीत व डीजेच्या दणदणाटात विधानभेसाठीच्या इच्छुकांकडून प्रमोशनचा जोरदार प्रयत्न झाला. राष्ट्रवादीचे इच्छुक महापौर संग्राम जगताप व काँग्रेसचे इच्छुक सत्यजित तांबे यांच्या समर्थकांनी उत्सवाचे निमित्त साधण्याचा प्रयत्न केला. नियमांची पायमल्ली करत मोठ्या आवाजात सुरू असलेल्या दणदणाटाकडे पोलिसांनीही दुर्लक्ष केले. आगामी गणेशोत्सवाचा वापरही प्रमोशनसाठी होण्याची शक्यता आहे.
दहीहंडीसाठी बॉलिवूडचे स्टार आणून गर्दी जमवण्याचे प्रकार शहरात यापूर्वी घडले नव्हते. मराठी तारकांची उपस्थिती यापूर्वी लागली होती. मात्र, यंदा विधानभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या उत्सवाचा उपयोग इच्छुकांनी पुरेपूर करून घेतला. महापौर जगताप यांच्या प्रेरणा प्रतिष्ठानने इम्पिरियल चौकात आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात बॉलविूड अिभनेता वविेक ओबेरॉय सहभागी झाला. या उत्सवात बक्षिसांची रक्कमही लाखाच्या पुढे होती.

शुभेच्छाफलकांची रांग रस्त्याच्या दुतर्फा लागली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत फलक लावणाऱ्यांवर कारवाई आवश्यक असतानाही फलकांची गर्दी झाली होती. आमदार अरुण जगताप हेही या उत्सवात उत्साहाने सहभागी झाले होते.

काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या शहराच्या जागेवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. काँग्रेस जागा आमचीच म्हणत राष्ट्रवादीला विरोध करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादीने महापौर जगताप यांना रिंगणात उतरवण्याची तयारी जोरात सुरू केली अाहे. महापौरांच्या वाढलेल्या प्रभाग पाहणी त्याचीच साक्ष देत आहेत. उत्सवाच्या निमित्ताने वविेक ओबेरॉयला आणून जगताप यांचे प्रमोशनचा प्रयत्न करण्यात आला.
दुसरीकडे काँग्रेसचे इच्छुक तांबे यांचे समर्थक असलेले माजी नगरसेवक धनंजय जाधव व इतर चार मंडळांनी दिल्ली दरवाजा परिसरात आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवासाठी अभिनेत्री सायली भगतला अाणले. काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी बाहेरचा उमेदवार म्हणून तांबे यांना विरोध करत आहेत. त्यांनी इच्छुक म्हणून पक्षाकडे अर्जही केला नसल्याचे सांिगतले जात आहे. मात्र, तांबे यांनी माघार घेतल्याचे अजूनही जाहीर केलेले नाही. पाणी वाचवण्याचा संदेश देत प्रमोशनाला सुरुवात केलेल्या तांबे समर्थकांनी दहीहंडी उत्सवाचाही पुरेपूर फायदा घेतला.
सेलिब्रेटींना पाहण्यासाठी उसळलेल्या गर्दीमुळे वाहतुकीच्या कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. चितळे रस्त्यावरही हेच चित्र होते. विधानभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक राजकीय नेत्यांनी या उत्सवाचा चांगलाच फायदा घेतला. शुभेच्छांच्या फलकांनी रस्ते भरून निघाले. डीजेंच्या मनसोक्त वापरावर नरि्बंध घालण्यास पोलिसही धजावले नाहीत. आगामी गणेशोत्सवात डीजेंचा अनरि्बंध वापर होण्यावर दहीहंडी उत्सवातून शिक्कामोर्तब झाले. यातून नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल कोणालाही घ्यावी वाटली नाही.
गेल्यावर्षी महापालिका निवडणुका लागल्याने वविधि उत्सव साजरे करणाऱ्या मंडळांना वर्गणीचा ताण पडला नाही. यावर्षीही विधानभा निवडणुकीची पर्वणी आल्याने वर्गणीसाठी मंडळांना अधिक ताण पडणार नाही. काही राजकीय नेत्यांनी आधीच मंडळांशी संपर्क साधून कोणालाही वर्गणी मागू नका, सर्व व्यवस्था करू, असे आश्वासन दिल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून खासगीत सांगण्यात येत आहे.
गेल्यावर्षीच्या कारवाया ठरल्या दिखाऊ...
डीजेला विरोध करत गेल्यावर्षीच्या गणेशोत्सवात तत्कालीन पोलिस अधीक्षक आर. डी. शिंदे यांनी कडक भूिमका घेतली. गणेशोत्सव, मोहरम व डॉ. आंबेडकर जयंतीला ध्वनिप्रदूषण केल्याच्या ८० पेक्षा अधिक फरि्यादी अधीक्षकांनी न्यायालयात दिल्या. मात्र, फरि्यादीची सुनावणी लांबणीवर पडत गेली व एकाही मंडळावर कारवाई झाली नाही. परिणामी अधीक्षकांकडून गेलेल्या फरि्यादी केवळ देखावा ठरल्या.