आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Daily Diary Of Combustion Issue At Nagar, Divya Marathi

आमदार राठोड यांचा फोटो नसल्याने दैनंदिनीचे दहन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिकेची नवीन दैनंदिनी (डायरी) यावर्षीही वादात सापडली आहे. दैनंदिनीत शहराचे आमदार अनिल राठोड यांचा फोटो नसल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी बुधवारी महापालिका कार्यालयासमोर दैनंदिनीचे दहन करून निषेध नोंदवला.
दैनंदिनीवरून गेल्यावर्षीही वाद निर्माण झाला होता. यावर्षी दैनंदिनी तयार करताना सत्ताधारी व अधिकार्‍यांनी आमदार राठोड यांच्या छायाचित्राचा जाणीवपूर्वक समावेश केला नाही, असा आरोप करून संतापलेल्या शिवसैनिकांनी दैनंदिनीचे मनपा कार्यालयासमोर दहन केले. दैनंदिनीत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री मधुकर पिचड, आमदार अरुण जगताप यांच्या छायाचित्रांचा समावेश आहे. परंतु मनपा क्षेत्रातील स्थानिक आमदार राठोड यांचे छायाचित्र नसल्याने शिवसैनिकांनी असंतोष व्यक्त केला. ही बाब राठोड यांची अवहेलना करण्यासारखी आहे. त्यामुळे याप्रकरणी दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करून राठोड यांच्या छायाचित्रासह नव्याने दैनंदिनी छापण्यात यावी; अन्यथा महापालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना नगरसेवकांनी दिला आहे.

यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक दिलीप सातपुते, गटनेता संजय शेंडगे, मनोज दुल्लम, उमेश कवडे, नितीन बारस्कर आदी उपस्थित होते