आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावठी हातभट्टीला आळा घालणार दक्षता पथके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मालवणी विषारी दारू दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गावठी हातभट्टी अवैध दारुनिर्मितीला आळा घालण्यासाठी विशेष दक्षता पथके कार्यरत झाली आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही पथके नेमली आहेत. गेल्या पाच दिवसांपासून या पथकांनी ९२ ठिकाणी छापे टाकले आहेत. आतापर्यंत २५ जणांना अटक करण्यात आली असून सुमारे दहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव- खेतमाळीस यांनी दिली.
मालाड येथील दुर्घटनेनंतर नगरचा राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाला आहे. या विभागाच्या दक्षता पथकांनी गेल्या पाच दिवसांत ९२ ठिकाणी छापे टाकून गावठी हातभट्टी कच्चे रसायन जप्त केले. संयुक्त कारवाईत एकूण ५०० लिटर हातभट्टी २० हजार लिटर कच्चे रसायन जप्त करण्यात आले. या मुद्देमालाची किंमत लाख ५५ हजार आहे.

२१ जूनला परराज्यात विक्रीसाठी जात असलेली दारू जप्त करण्यात आली. एका मारुती कारमध्ये ही दारू नेली जात होती. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर गावाच्या पश्चिमेला वासुंदे चौकात ही कारवाई करण्यात आली. या कारमध्ये दमणहून अाणलेली ऑफिसर चॉईस, बॅगपाइपर, रॉयल स्टॅग, इंम्पिरिअल ब्लू आदी नामांकित ब्रँडची दारू होती. एकूण ४३० बॉक्स जप्त करण्यात आले. या मुद्देमालाची किंमत लाख २० हजार रुपये आहे.

बुधवारी साकत, खंडाळा, सुरेगाव या ठिकाणी एकूण २१ छापे टाकण्यात आले. या कारवाईत १७० लिटर हातभट्टीची दारू हजार ६०० लिटर रसायन जप्त करण्यात आले. हा मुद्देमाल सुमारे दोन लाख रुपयांचा असून उत्पादन शुल्क विभागाने तो नष्ट केला. यापुढेही या कारवाईत सातत्य राहील, असे भाग्यश्री जाधव यांनी सांगितले.

हातभट्टीचा महापूर
पाचदिवसांपासून उत्पादन शुल्क विभागाची कारवाई सुरू आहे. साकत, खंडाळा, खडकी, सुरेगाव यासह २९ ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईत १७० लिटर हातभट्टी, तसेच हजार ६०० लिटर रसायन नष्ट करण्यात आले. एकूण लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तत्पूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी, सूत गिरणी, संजयनगर, राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा, कोपरगाव, तपोवन, कापूरवाडी, ब्रह्मतळे, सुरेगाव आदी ठिकाणी छापे टाकून साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावरून ग्रामीण भागात हातभट्टीचा महापूर सुरू असल्याचे दिसते.

कारवाईत सातत्य राखणार
मालाड येथील दुर्घटनेच्या आधीपासून जिल्ह्यात गावठी हातभट्ट्या अवैध दारूविक्री करणावर कारवाई होत आहे. मात्र, या घटनेच्या पार्श्वभूमीवर कारवाई आणखी कडक करण्यात आली आहे. गावठी हातभट्टीवर होत असलेल्या कारवाईमुळे देशी, वेशी दारूविक्री करणारे एमआरपीपेक्षा अधिक दराने दारूविक्री करत असल्याच्या तक्रारी आल्या. अशा विक्रेत्यांवरही दंडात्मक कारवाई करत आहोत. जिल्ह्यात गावठी हातभट्टी, देशी, वेशी दारू, ताडीची कसल्याही परिस्थितीत बेकायदा विक्री होऊ देणार नाही.'' भाग्यश्रीजाधव-खेतमाळीस, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क.

ताडी दुकानांचे परवाने निलंबित
अन्नऔषध प्रशासन विभागाने घेतलेल्या विविध नमुना चाचण्यांमध्ये काही ताडी दुकानांमधून विक्री होत असलेली ताडी सदोष आढळली. अशा दुकानांवरही विभागाने कडक कारवाई केली आहे. आतापर्यंत दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अवैध ताडीविक्री होऊ नये, म्हणून विशेष दक्षता घेतली जाणार आहे. या संधीचा फायदा घेत काही देशी, वेशी मद्यविक्रेते एमआरपीपेक्षा अधिक दराने मद्यविक्री करत असल्याची बाबही उजेडात आली. त्यामुळे संबंधित दुकानांवर नियमभंगाच्या केस नोंदण्यात आल्या. काही दुकानांवर ३० ते ३५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...