आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दलित मुलीच्या खून प्रकरणाच्या चौकशीसाठी लहुजी सेनेचा मोर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- तालुक्यातील कामरगाव येथील दलित समाजातील अल्पवयीन मुलीवर रॉकेल ओतून पेटवून खून करण्याच्या मागील महिन्यातील घटनेची चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.

लहुजी सेनेचे राज्यप्रमुख बाळासाहेब बागूल यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. लालटाकी येथून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चात सेनेचे सचिव हनिफ पठाण, जिल्हाप्रमुख सुनील सकट, जिल्हा संपर्कप्रमुख साहेबराव काते, दत्तात्रेय ससाणे यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कामरगाव येथील मातंग समाजातील अल्पवयीन मुलीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्यात आले. गंभीर भाजल्याने मुलीचा मृत्यू झाला. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, तसेच मुलीच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने तातडीने 10 लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. अत्याचार न थांबल्यास जिल्हाभर रास्ता रोको करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.