आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारदरा 70, तर मुळा 50 टक्के

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - सह्याद्री गिरीशिखरांवर पाऊस सुरूच असल्याने रविवारी भंडारदरा 70 टक्के, तर मुळा धरण 50 टक्के भरले. भंडारद-यातील साठा 7,713, तर मुळातील साठा 13,411 दशलक्ष घनफूट झाला आहे. रविवारी सकाळपासून भंडारद-यातून विद्युत निर्मितीसाठी सोडले जाणारे पाणी बंद करण्यात आले.
मुळा नदीचा विसर्ग 7310 क्युसेक्स सुरू आहे. निळवंडे धरणातील साठा 2,891 दशलक्ष घनफूट झाला आहे. रविवारी भंडारदरा येथे 41, घाटघर 63, रतनवाडी 128, पांजरे 66, तर वाकी येथे 40 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अकोले तालुक्यात सर्व लहान धरणे भरली आहेत. जिल्ह्यात इतरत्र मात्र पाऊस नाही.
फोटो - डमी पिक