आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेडछाड रोखण्याकरिता 'दामिनी पथका'ची गरज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शाळा,महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्यांवर कडक नजर ठेवण्यासाठी नगरमध्येही दामिनी पथकाची गरज भासत आहे. या पथकामध्ये महिला पोलिसांचा समावेश असल्यामुळे टवाळखोरांच्या मुसक्या आवळल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सध्या नगरमध्ये रोडरोमिओंना आळा घालण्यासाठी निर्भया पथक कार्यरत आहे. मात्र, हे पथक एकाच वेळी सर्वच भागात जाऊ शकत नाही. त्यामुळे दामिनी पथकाची संकल्पना रुजावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

उपनगरे, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थिनी शहरात शिक्षण घेण्यासाठी येतात. या िवद्यार्थिनींचा पाठलाग करून त्यांची छेड काढण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. जिल्हा पोलिस दलाने नियंत्रण कक्षामध्ये नुकत्याच सुरू केलेल्या व्हॉट्स अॅप सेवेवरही या स्वरूपाच्या तक्रारी येत आहेत. शहरातील महाविद्यालयांमध्ये अनुचित प्रकार घडू नयेत, छेडछाडीला, रोडरोमिआेंना आळा बसावा, याकरिता विशेष छेडछाड प्रतिबंधक पथक कार्यरत आहे. एक महिला पोलिस उपनिरीक्षक, पाच पोलिस कर्मचारी, चालक एक वाहन असे या पथकाचे स्वरूप आहे.

शहरात सध्या असलेले निर्भया पथक दररोज विविध महाविद्यालयांमध्ये गस्त घालून आढावा घेते. कोठे काही अनुचित प्रकार आढळला, तर तत्काळ हस्तक्षेप केला जातो. एखादी तक्रार आली, तर त्याची दखल घेऊन त्यावर तत्काळ कारवाई करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, हे पथक एकाच वेळी सर्व ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे एकाच वेळी अनेक ठिकाणी छेडछाडीच्या प्रकारांना रोमिआंंेना आळा घालण्यासाठी शहरातील पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत मोटारसायकलींवर दामिनी पथके नियुक्त करण्याची मागणी होत आहे.
तारकपूर, माळीवाडा, स्वस्तिक बसस्थानकापासून महाविद्यालये, शाळांमध्ये विद्यार्थिनी येतात. अशा परिसरात तरुणांचे टोळके भरधाव वेगात, जोराने हॉर्न वाजवत जातात. विद्यार्थिनींची छेड काढली जाते. अशा रोडरोमिआंेना छेडछाड विरोधी पथकाकडून समज दिली जाते. मात्र, हे पथक निघून गेले की, पुन्हा छेडछाड सुरू होते. म्हणूनच दामिनी पथकाची संकल्पना शहरात रुजली, तर महिला मुलींना संरक्षण मिळेल, असा विश्वास आहे.

अशी असते "दामिनी पथका'ची पेट्रोलिंग
दामिनीपथकातील महिला पोलिस कर्मचारी मोटारसायकलवरून शहरात पेट्रोलिंग करतात. शहरातील एटीएम सेंटर, शाळा, महाविद्यालये, बसस्थानक, खासगी क्लासेससमोर, शोरुम, महिलांची गर्दी असलेल्या बाजारपेठेत, चित्रपटगृहासमोर पथक कार्यरत असते. काही ठरावीक ठिकाणी व्हिजिट बुक ठेवलेले असून तेथे भेट दिल्याच्या नोंदी केल्या जातात. त्यांच्याकडे वॉकीटॉकी देण्यात आली आहेत. हे पथक रोडरोमिओंना छेडछाड करणाऱ्यांवर कडक नजर ठेवते. वेळ पडल्यास शहरातील टवाळखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी गरज भासल्यास शहर पोलिसांची मदत घेतली जाते.

असे आहे पथक
सध्यामुंबई, पुणे, सोलापूर या शहरात महिला अत्याचार विरोधी पथके कार्यरत आहेत. या पथकांमध्ये १६ महिला पोलिसांचा समावेश आहे. या पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले अाहे. त्यांच्याकडे मोटारसायकली स्टेनगन देण्यात आल्या आहेत. नगरमध्ये इतक्या पोलिसांची नेमणूक करणे, त्यांना हत्यार देणे शक्य नसले, तरी किमान मोटारसायकली उपलब्ध करून दिल्या, तरी चांगला परिणाम होऊ शकतो. त्यामुळे इतर शहरांच्या धर्तीवर नगरमध्येही पथकाची नियुक्ती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

छेडछाडीला आळा बसेल
कापडबाजार,चितळे रस्ता परिसरात महिला युवतींची गर्दी असते. सध्या आरास पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांचीही गर्दी वाढली आहे. कापडबाजार परिसरात गर्दीचा गैरफायदा घेत महिलांच्या पर्समधून दागिने, रोकड चोरीला जाण्याचे प्रकार घडले आहेत. सायंकाळी उपनगरात खासगी क्लासेस परिसरात विद्यार्थिनींची गर्दी असते. अशा ठिकाणी दामिनी पथकाची गस्त असावी. शहरातील चेन स्नॅचिंग ज्येष्ठांची दिशाभूल करून लुटमार होण्याच्या प्रकारांनाही आळा बसेल. सायली लवाटे, विद्यार्थिनी.