आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लॅकमेलरला ‘दामिनी’चा हिसका; लेखी माफीनाम्यानंतर दिले सोडून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विवाहितेकडे प्रेमसंबंधांचा आग्रह धरणा-या व्यक्तीला पोलिसांच्या ‘दामिनी’ पथकाने चांगलाच हिसका दाखवला. यापुढे महिलेला त्रास देणार नाही, अशी हमी दिल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. चिकलठाण्यातील कामगार कॉलनीत राहणा-या 22 वर्षीय विवाहितेचा शेजारी व्यक्तीने तिच्याकडे प्रेमसंबंधांचा आग्रह धरला. विवाहितेचा पती शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात नोकरीला आहे. या दांपत्याला दोन मुले असून त्यांच्या शेजारी राहणारी 27 वर्षीय व्यक्तीही शेंद्रा येथील कंपनीत नोकरीला आहे. मोबाइलवरील संभाषण नव-याला ऐकवण्याची धमकी त्याने विवाहितेला दिली होती. महिलेने दामिनी पथकाच्या प्रमुख नीता मिसाळ यांना मोबाइलवर घटना सांगितली होती.
27 महिलांना दिला मदतीचा हात
2 जानेवारी 2014 रोजी तत्कालीन पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी दामिनी पथकाची स्थापना केली. त्यानंतर दामिनीने 27 जणींची त्रासातून सुटका केली आहे. पथकाकडे लेखी तक्ररींचे प्रमाण वाढल्याचे मिसाळ यांनी सांगितले. मदतीसाठी (7798360020 किंवा 9158042444) या क्रमांकांवर संपर्क साधावा.