आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अदितीचे कथ्थक नृत्य रंगले, वर्धापन दिनानिमित्त बहारदार मैफल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कथ्थक नृत्यांगना चित्रपट कलावंत अदिती भागवत हिने कथ्थक शास्त्रीय संगीताचा उगमापासून आजपर्यंतचा बहारदार प्रवास नृत्याच्या माध्यमातून नगरकर रसिकांसमोर उलगडून दाखवला. तिने सादर केलेल्या "आवर्तन' या कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. येथील आयएमएस -व्हिडिओकॉन अकॅडमीच्या वर्धापन दिनानिमित्त सावेडीतील माउली सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. भा. पां. हिवाळे शिक्षण संस्थेचे विशाल बार्नबस, माजी सचिव फिलिप्स बार्नबस, आयएमएसचे सरसंचालक डॉ. शरद कोलते, संचालक डॉ. एम. बी. मेहता, प्राचार्य माधवी सराफ आदी या वेळी उपस्थित होते.

पुरातन काळात मंदिरात उगम झालेल्या कथ्थक नृत्यशैलीची विविध रूपे, चित्रपटसृष्टीतील प्रवेश, फोक डान्स लावणीत कथ्थक शैलीचा वापर, आजच्या आधुनिक काळात फ्यूजनमधून संगीताशी बसवलेला ताळमेळ यांचे विलोभनीय दर्शन सहकलाकारांसह अदिती भागवत हिने सादर केले. कथ्थक सुफी गीतांचा मिलाफ कथारचनांवर आधारित नृत्याचा आनंद, हे सर्व नृत्यप्रवासातून मिळालेल्या अनुभवांतून अदिती तिच्या टीमने सादर केले.

अदितीला सहनृत्यांगना म्हणून स्मिता वेताळे, मनाली कुलकर्णी, तनुजा सरोदे, हार्मोनियमवर वैभव मंकड, जम्बे ड्रमवर शिखरनाद कुरेशी, तबल्यावर स्वप्निल भिसे, शशांक आचार्य यांनी बासरीची साथसंगत केली. मेकअप हेअर स्टायलिस्ट म्हणून विमल सालियन, तर प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून विकी ठाकूर यांनी जबाबदारी पार पाडली. या सर्वांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.
अदितीने या कार्यक्रमाचे ३५ प्रयोग अमेरिकेतही सादर केले आहेत. या वेळी बाळासाहेब गांधी, श्रीगोपाल धूत, मोहन मानधना, सविता फिरोदिया यांच्यासह शहरातील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले. डॉ. मेहता यांनी आभार मानले.