आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर दरेकरांचा 'भोस' होईल : शेलार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे - राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रा. तुकाराम दरेकर हे माजी मंत्री बबनराव पाचपुतेंसोबत पुन्हा गेले, तर त्यांची स्थिती बाबासाहेब भोस यांच्यासारखी होईल, अशी टीका जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली.

शेलार म्हणाले, विरोधक संपवता येत नसेल, तर त्यास जवळ घेऊन संपवायचे हे पाचपुतेंचे धोरण असते. याचा अनुभव भोस यांना आला असेल. काँग्रेसमध्ये असताना भोस यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद, अध्यक्षपद, काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद, लोकसभेचे तिकीटही मिळाले होते. पुढे भोस यांनी पाचपुतेंची संगत केली. त्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाली नाही, मुलाला पंचायत समिती नगरपरिषदही नाकारली. भगवानराव पाचपुते, डी. एम. भालेराव, घनश्याम शेलार, अण्णा पाटील पवार, अरुणराव पाचपुते यांसह अनेकांना पाचपुतेंच्या या शैलीचा तडाखा बसलेला आहे. प्रा. दरेकर हे सुज्ञ असल्याने ते घाईत कोणताही निर्णय घेणार नाहीत, असे भाकीत शेलार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलेे.

भोस आजही नेतेपदीच
भोस हे आजही आमच्या गटाचे नेते आहेत. श्रीगोंदे नगरपालिकेचा कारभार भोस यांच्या मार्गदर्शनाखाली चालतो. कारखान्यात सत्तांतर झाल्यास त्यांच्या सल्ल्यानेच कारभार केला जाईल.' बबनरावपाचपुते, माजी मंत्री.

असंतुष्टांशी बोलणी
प्रा. दरेकरांची भावना आम्ही समजू शकतो. मी स्वतः त्यांना भेटलो. कारखान्याशिवाय देखील बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. दरेकरांसह अन्य असंतुष्टांची बोलणी सुरू आहे. कोणीही पाचपुतेंसोबत जाणार नाही.'' शिवाजीरावनागवडे, माजी आमदार.