आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कलंकित मंत्र्यांचा समावेश - राधाकृष्ण विखे यांची भाजप सरकारवर टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ज्यांच्या एसआयटीमार्फत चौकशा सुरू आहेत, न्यायालयात खटले दाखल आहेत अशा आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात अाला आहे. सरकारचे नेमके काय चालले तेच कळत नाही. कलंिकत असलेल्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन सरकारला काय साध्य करायचे आहे, असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. या कलंिकत मंत्र्यांबाबत आपण सरकारला जाब विचारणार असल्याचेही विखे यांनी सांगितले.

विखे म्हणाले, दलितांबद्दल अनुदगार काढणाऱ्या रवींद्र चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश करणे म्हणजे आंबेडकरवादी चळवळीचा अवमानच आहे. सरकारने आंबेडकरांच्या विचारांशी पूर्णपणे फारकत घेतली असल्याचे यावरून स्पष्ट होते. केंद्रात मंत्रिपद मिळालेले दलित नेते रामदास आठवले यांनी याबाबत विचार करण्याची आवश्यकता आहे, असे विखे यावेळी म्हणाले.

नाशिक येथील आयुक्तांची बदली करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी चूक आहे. सोलापूरच्या एका अधिकाऱ्याने हजारो शेतकऱ्यांना उद््ध्वस्त करत पालकमंत्र्यांना तुरूंगात घालायला कमी केले नाही. अशा अधिकाऱ्यांना मात्र राजकीय अभय देण्यात आले. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्याचा सरकारचा दावा खोटा आहे. कमी होण्याऐवजी त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसाला सुरूवात होताच छावण्या बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. पावसाला सुरूवात झाली असली, तरी नवीन चारा उपलब्ध होण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे. प्रशासनाने चुकीचा अहवाल सादर केल्यामुळेच सरकारने छावण्या बंद करण्याचा चुकीचा निर्णय घेतला असल्याची टीका विखे यांनी यावेळी केली.

भाजीपाला नियमनमुक्तीचा निर्णय योग्यच
राज्यातीलबाजार समित्यांमध्ये फळे भाजीपाला नियमनमुक्त करण्याचा सरकारचा निर्णय योग्यच आहे. सरकारच्या या निर्णयाचे मी समर्थन करतो. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री करण्याची मुभा असलीच पाहिजे. राज्यातील ९० टक्के बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याचे व्यवहार होतच नाहीत. त्यामुळे बाजार समित्यांनी बंद पाळून विनाकारण शेतकऱ्यांना वेठीस धरू नये, असे विखे म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...