आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Datta Tapkire Selected For Nagar District Sub Head

नगर शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी दत्ता तापकिरे यांची नियुक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी दत्ता तापकिरे यांची नियुक्ती करण्यात आली. तापकिरे यांना जिल्हा संपर्कप्रमुख सुहास सामंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, भीमराज आव्हाड, अनिल गिते, सुधीर पोटे, मोहन पालवे, सचिन दुसुंगे, योगेश गलांडे, सागर कर्डिले, बाळासाहेब घुले आदी उपस्थित होते.
तापकिरे बुऱ्हाणनगर येथील रहिवासी असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन शिवसेनेने त्यांची नियुक्ती केली आहे. शिवसेनाप्रमुखांचे विचार गाव पातळीवर पोहोचवण्याचा आपला प्रयत्न राहील. शिवसेनेत सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला जातो, लवकरच गावोगावी शाखा सुरू केल्या जातील, असेही तापकिरे म्हणाले.