आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरूषाच्या वेशात आलेल्या सुनेचा सासू- सासर्‍यांवर चाकू हल्ला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर- पुरुषाच्या वेशात येऊन सुनेने तिच्या सासू सासर्‍यांवर चाकू हल्ला केल्याची धक्कादाय घटना अहमदनगर जिल्ह्याततील धेंडगाव येथे घडली आहे. या हल्ल्यात सासू- सासरे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे. हल्लेखोर सुनेविरोधात नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सून अद्याप फरार आहे. पोलिस तिचा शोध घेत आहेत.

सूनेने तिच्या सासू- सासर्‍यांवर केलेल्या हल्ल्यामागचे कारण समजू शकले नाही.