आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण झालेल्या 5 वर्षीय वैभवचा मृतदेह सापडला, संपत्तीच्या वादातून खून झाल्‍याचा संशय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे - मागील महिन्यात तालुक्यातील भिंगाण येथील पाच वर्षांच्या मुलाचे अपहरण झाले होते. या चिमुकल्याचा मृतदेह सोमवारी सकाळी भिंगाण शिवारात आढळला. भिंगाण येथून १३ नोव्हेंबरला वैभव बापू पारखे या बालकाचे अपहरण झाले होते. त्याचे वडील बापू पारखे यांनी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी शोधमोहीम राबवली, पण बालकाला शोधण्यात यश आले नाही. वैभवचे अपहरण संपत्तीच्या वादातून की, नरबळीसाठी झाले याबाबत पोलिसांचा शोध सुरू होता.

 

सोमवारी बापू पारखे यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या काटेरी झुडपात वैभवची पॅन्ट डोक्याची कवटी गुराख्यांनी पाहिली. त्यांनी लगेच पोलिसांना खबर दिली. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, उपनिरीक्षक महावीर जाधव हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. वैभवचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह एखाद्या खड्ड्यात पुरला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. याबाबत पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार म्हणाले, हे प्रकरण अतिशय नाजूक आहे. त्यामुळे वैभवच्या मृतदेहाची आम्ही डीएनए चाचणी करणार आहोत. खून कशा पद्धतीने करण्यात आला, हे वैद्यकीय अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. दरम्यान, या प्रकारामुळे गावात, तसेच तालुक्यात खळबळ उडाली आहे. संपत्ती किंवा मालमत्तेच्या वादातून बालकाची हत्या करण्यात आल्याची उलटसुलट चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...