आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाथर्डीमध्ये दोन गटात हाणामारी, मध्यस्थी करणाऱ्या तरुणाच्या मृत्यूनंतर तणाव; 4 जणांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डीतील तणावाचे वातावरण आता निवळू लागले आहे. - Divya Marathi
पाथर्डीतील तणावाचे वातावरण आता निवळू लागले आहे.
अहमदनगर- पाथर्डी येथे अवैध प्रवासी वाहतुकीवरुन दोन गटात झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. सचिन पवार असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. मध्यस्ती करायला गेलेल्या या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 
बुधवारी अवैध प्रवासी वाहतुकीवरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. यावेळी सचिन पवार त्या दोन गटात मध्यस्ती करण्यासाठी गेला होता. मात्र, त्यावेळी सचिनवरही लाकडी दांडके आणि दगडाने हल्ला करण्यात आला होता. यानंतर गंभीर जखमी झालेल्या सचिनला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण शुक्रवारी पहाटे सचिनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 
 
बातम्या आणखी आहेत...